जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये स्वीटीची सुवर्ण कामगिरी

जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये स्वीटीची सुवर्ण कामगिरी

नवी दिल्ली : जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये (Womens World Boxing Championship)स्वीटी बोरा (Sweety Bora)हिने आज भारताला दुसरे सुवर्णपदक (Gold Medal)मिळवून दिले आहे. तिने 81 किलो वजनी गटात चीनच्या वांग लिन हिला स्प्लिट निर्णयाने पराभूत करून पदक जिंकले आहे.

यंदाच्या जागतिक स्पर्धेत भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. त्याआधी नीतू घंघासने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. 2014 मध्ये स्वीटीने रौप्य पदक जिंकले होते. तब्बल नऊ वर्षानंतर तिला तिच्या पदकाचा रंग बदलण्यात यश आले आहे.

Eknath Shinde : थोडं थोडं प्यायचं असतं पण विरोधकांना लोटा भरुन प्यायची सवय

स्वीटीने 2014 मध्ये दक्षिण कोरियामध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता पण तिला चीनच्या यांग झियाओलीने पराभूत केले होते. 9 वर्षांनंतर चीनच्या बॉक्सिंगला पराभूत करूनच तीने सुवर्णपदक जिंकले आहे.

स्वीटीने हा सामना 4-3 अशा फरकाने जिंकला आहे. स्वीटीने पहिल्या फेरीपासूनच चिनी बॉक्सरवर वर्चस्व राखले. तीने पहिल्या फेरीतच चिनी बॉक्सरच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसे लगावले आणि पहिली फेरी 3-2 अशी जिंकली.

दुसऱ्या फेरीतही स्वीटी बोराने सावध सुरुवात केली. तिने प्रथम चीनची बॉक्सर वांग लीनाविरुद्ध बचावात्मक भूमिका घेतली. यादरम्यान त्याला सरळ धक्काही लागला. पण, तरीही हिंमत न हारता पलटवार करत 3-2 अशा फरकाने दुसरी फेरी जिंकली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube