Exam : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) विद्यार्थ्यांसाठी (Students) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारीला होणाऱ्या एकूण 30 परीक्षा (Exam) पुढे ढकलल्या आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचं मतदान (Election) 30 जानेवारीलाच होणारंय. त्यामुळं विद्यापीठानं नियोजित केलेल्या या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. आता या परीक्षा 7 फेब्रुवारी 2023 रोजी […]

Untitled Design

Untitled Design

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) विद्यार्थ्यांसाठी (Students) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारीला होणाऱ्या एकूण 30 परीक्षा (Exam) पुढे ढकलल्या आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचं मतदान (Election) 30 जानेवारीलाच होणारंय. त्यामुळं विद्यापीठानं नियोजित केलेल्या या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. आता या परीक्षा 7 फेब्रुवारी 2023 रोजी होणार असल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात आलंय.
YouTube video player
कोकण शिक्षक मतदारसंघातील मतदान 30 जानेवारीला असल्यानं या दिवशी मुंबई विद्यापीठाच्या नियोजित सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात. पुढे ढकललेल्या 30 विषयांच्या परीक्षांमध्ये एमए सेमिस्टर 2, 3, आणि 4, एलएलएम सेमिस्टर 3 आणि बीबीए आणि एलएलबी सेमिस्टर 3, अभियांत्रिकीमध्ये एसई सेमिस्टर 3, एमएस्सी सेमिस्टर चार आणि एमएस्सी पार्ट 2, बीकॉम पार्ट 2 या मुख्य परीक्षांचा समावेश आहे.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 30 जानेवारीला असल्यानं निवडणूक आयोगानं ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांना सुट्टी जाहीर केली आहे.

त्यामुळं परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये म्हणून या दिवशीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विविध विद्यार्थी संघटना आणि शिक्षक संघटनांनी केली होती. त्यामुळं परीक्षा विभागानं त्या दिवशी होत जवळजवळ 30 परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

Exit mobile version