Video : भावनेच्या भरात… रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis भारतातल्या चौकशी यंत्रणा आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत, अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडून चौकशीसाठी लोक बोलावले जातात.

Video : भावनेच्या भरात... रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Video : भावनेच्या भरात... रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis On Rohit Pawar Press Conference : अजितदादांचा विमान अपघात घातपात तर नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी काही व्हिडिओ क्लिप्स आणि काही कागदपत्रे समोर आणत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भावनेच्या भरात रोहित पवार असं बोलले असतील अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Video : अमेरिकेसोबतची डील म्हणजे भारतमातेची विक्रीच; राहुल गांधी थेट आरोप; भाजपचंही प्रत्युत्तर

…तर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो

विमान अपघातासंदर्भात जी काही चौकशी सुरू आहे ती, पूर्ण न होता, आपण जर वेगवेगळे तर्क-वितर्क लावले, तर त्यासंदर्भात लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. दादांच्या अपघाताची पूर्ण, सखोल आणि नीट चौकशी झाली पाहिजे, ही रोहित पवारांची मागणी काही चुकीची नसल्याचे फडणवीस म्हणाले. Devendra Fadnavis On Rohit Pawar Press Conference

अजितदादा पवार आपल्या महाराष्ट्राचं लाडकं आणि वरिष्ठ नेतृत्व होतं

अजितदादा पवार हे आपल्या महाराष्ट्राचं लाडकं आणि वरिष्ठ नेतृत्व होतं त्यामुळे या अपघातीची सखोल चौकशी व्हावी ही मागणी पहिल्यांदा मी स्वतः केलेली. आपल्याला कल्पना असेल तर मी केंद्र सरकारला कल्पना देऊन, या अपघाताची योग्य प्रकारे चौकशी करावी, असं सांगितलं होतं, त्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी गठीत करुन त्यासंदर्भातलं पत्रही मला पाठवलं आहे… आता सध्या चौकशी सुरू असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Video : दादांचा घातच! विमान कंपनीचा मालक पोहचलेला, आमचा मुख्य वैमानिकावर आक्षेप

छोट्या देशांमध्ये आपल्याकडून चौकशीसाठी लोक बोलावले जातात

भारतातल्या चौकशी यंत्रणा आंतरराष्ट्रीय स्तराच्या आहेत, अनेक छोट्या देशांमध्ये आपल्याकडून चौकशीसाठी लोक बोलावले जातात. त्यामुळे भारतातील चौकशी यंत्रणांवर कोणीही अविश्वास दाखवू नये. ब्लकबॉक्सही सापडलेला असून, भावनेच्या भरात कदाचित रोहित पवार असं बोलले असतील, पण आपल्याच देशातल्या एजन्सीवर आपण अशाप्रकारे कधी अविश्वास दाखवत नाही त्यामुळे या ठिकाणीही दाखवण्याचं कारण नाही अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी रोहित पवारांच्या उपस्थित केलेल्या शंकांवर दिली आहे.

 

Exit mobile version