Rahul Narwekar Viral Video : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक नवीन व्हिडिओ सध्या व्हायरल झाला. अलिबागमधील एका गावामध्ये नार्वेकर (Rahul Narwekar) हे जमीन मोजणीचे कर्मचारी घेऊन गेले होते. मोजणीच्या वेळी गावातील लोकांशी नार्वेकर व मोजणी कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. एक महिला आणि काही ग्रामस्थ हे संतप्त झाल्यानंतर राहुल नार्वेकर हे तिथून निघून गेल्याचा व्हिडिओ आहे.
या व्हिडिओवरून काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा)चे प्रवक्ते संजय राऊत यांना आता राहुल नार्वेकरांना घेरले आहे. अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दादागिरी करत आहेत. शेतीमध्ये मोजणी करण्याचे काम करत होते, असा आरोप काँग्रेसने केलाय.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. अलिबागमधील एका वादात जमिनीच्या मोजणीवेळी काही जणांशी नार्वेकर यांचा वाद झाला. त्यानंतर ते तेथून निघून गेलेत. pic.twitter.com/pu6AkuX2DN
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) February 14, 2026
तर संजय राऊत यांनी हा व्हिडिओ एक्सवर शेअर करत काही प्रश्न उपस्थित केलेत. विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे ! तुम्ही सांगताय की मी सांगू? असे संजय राऊत यांनी म्हटलंय. राऊत यांनी हा व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पीएमओ इंडिया आणि राहुल नार्वेकर यांना टॅग केलाय. या व्हिडिओवर अद्याप तरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कुठलेही प्रतिक्रिया दिलेली नाही.
