Video : हो मी तीच आहे! भाजपा मोर्चातील व्हायरल ‘म्याडम’ पुन्हा का भडकल्या?

मला मागच्या काळात बरेच मेसेज आले. माझ्याविषयी चिंता व्यक्त करणारे हे मेसेज होते.

News Photo   2026 05 02T201404.166

Video : हो मी तीच आहे! भाजपा मोर्चातील व्हायरल 'म्याडम' पुन्हा का भडकल्या?

काही दिवसांपूर्वी मुंबईत भाजप (BJP) मोर्चामध्ये फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना सुनावल्याने मोर्चाची कमी आणि त्या महिलेचीच जास्त चर्चा झाली. विरोधकांनी तर भाजपाला महिलांनीच जागा दाखवली असे म्हणते खिजवण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या संतापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. दरम्यान, आता या महिलेने समोर येत तिची बाजू मांडली आहे. विशेष म्हणजे तिने सर्वच राजकीय पक्षांना एक गंभीर इशारा दिला आहे. या महिलेच्या नव्या व्हिडीओचीही आता तेवढीच चर्चा होत आहे.

ती महिला मीच आहे

मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाल्याने मंत्री गिरीश महाजन यांच्यावर संताप व्यक्त करणाऱ्या या महिलेचे नाव टीना चौधरी असे आहे. या महिलेने आता 21 एप्रिल रोजी घडलेल्या प्रकारावर स्पष्टीकरण दिले आहे. त्या दिवशी नेमके काय घडले होते? याची सविस्तर माहिती या महिलेने दिली आहे. वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात तुम्ही काळी टोपी, काळे शर्ट घातलेल्या एका महिलेचा व्हिडीओ पाहिला असेल. ती महिला मीच आहे. माझे नाव टीना चौधरी आहे. मला मागच्या काळात बरेच मेसेज आले. माझ्याविषयी चिंता व्यक्त करणारे हे मेसेज होते. मी सर्वांचे आभार मानते, असं टीना चौधरी म्हणाल्या आहेत.

Exit mobile version