Download App

Video : संजय राऊत बोलत होते अन् तेवढ्यात आला मोठा साप…

Sanjay Raut : पत्रकार परिषदांतून केंद्र, राज्य सरकार आणि भाजप नेत्यांवर कडाडून हल्ला चढविणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या आजच्या पत्रकार परिषदेत अचानक साप आला. सापाला पाहून सगळ्यांचीच धावपळ झाली. आज सकाळीच ही घटना घडली.

खासदार संजय राऊत नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळेस पत्रकार परिषद घेत होते. त्याच वेळी अगदी त्यांच्या खुर्चीजवळच साप आला. पांदीवड प्रकारातील हा एक बिनविषारी साप होता. पण, त्यानंतर पत्रकार परिषदही आटोपती घेण्यात आली. त्यानंतर सर्पमित्रांना बोलावून साप पकडण्यात आला. पिशवीत साप टाकून सर्पमित्र घेऊन गेले.  या घटनेची मात्र चांगलीच चर्चा रंगली होती.

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषदेत त्यांनी नेहमीप्रमाणे भाजप नेते अन् सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यातील तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जात आहे. त्यांच्याशी डिलिंग केली जात आहे. तसेच या अट्टल गुन्हेगारांना निवडणुकी आधी बाहेर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असा सनसनाटी आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. याबाबतचे पुरावे लवकरच देणार असल्याचं राऊत यांनी सांगितले. संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातून अनेक तुरुंगातील भयंकर गुन्हेगारांशी संपर्क साधला जात आहे. काही लोकांना जामीन देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. त्याबाबतचे लवकरच पुरावे देईल. 302 च्या गुन्ह्याखाली आत असलेल्या गुन्हेगारांना निवडणुकीपूर्वी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी गुन्हेगारांशी डिलिंग सुरु आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Tags

follow us