प्रशांत गोडसे
(लेट्सअप प्रतिनिधी)
मुंबई – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्याच पार्श्वभूमी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) दररोज पत्रकार परिषदेचे आयोजन केले जात आहे. गेल्या आठवड्यात महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केले. त्यानंतर आज मुंबई काँग्रेसच्यावतीने देखील जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी पत्रकार परिषदेनंतर मुंबई जाहीरनामा प्रकाशित न करता काढता पाय घेतला. त्यामुळे उलट-सुलट चर्चांना वेग आला आहे.
विरोधकांच्या भूलथापांना जनता भुलणार नाही ; विंगमध्ये डॉ. अतुलबाबा भोसले यांचं विधान
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपच्या केंद्रीय वरिष्ठ नेत्यांच्या दररोज मुंबईत पत्रकार परिषद होत आहे. तर दुसऱ्या बाजूला, काँग्रेस पक्षाकडून देखील दिल्लीतील जेष्ठ नेत्यांच्या पत्रकार परिषद संपन्न होत असून काँग्रेस आणि भाजपा एकमेकांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून टिका करीत आहेत. आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजित करण्यात आले होते. पत्रकार परिषदेनंतर मुंबईकरता तयार केलेल्या मुंबई काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार होता. पी. चिदंबरम यांच्या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. पी. चिदंबरम यांची पत्रकार परिषद संपताच वर्षा गायकवाड यांनी त्यांना मुंबईचा जाहीरनामा प्रकाशन करण्याचा आग्रह केला. मात्र त्यांनी काढता पाय घेतला.
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, बच्चू कडूंचा भाजपवर हल्लाबोल
वर्षा गायकवाड यांनी आग्रह धरूनही जाहीरनामा प्रकाशन करण्यास चिदंबरम यांनी नकार का दिला याविषयीचे कारण समजू शकले नाही. मात्र यावेळी मुंबई काँग्रेसच्या जाहीरनामापेक्षा चिदंबरम यांचीच चर्चा सध्या रंगू लागली आहे. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा-खासदार वर्षा गायकवाड आणि काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष पवन खेरा यांच्या हस्ते “मुंबईनामा” जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला.
मुंबई कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात काय?
मुंबई कॉंग्रेसने मुंबईनामा नावाने जाहिरनामा प्रसिद्ध केला असून मविआ सत्तेत आल्यानंतर अदानीचा धारावी प्रकल्प रद्द करून नवीन धारावी पुनर्वसन प्रकल्प रहिवाश्यांच्या इच्छेचा आदर करुन राबविला जाणार असल्याचं या जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात आलं. या प्रकल्पात ५०० चौरस फुटांचा भुखंड आणि आर्थिक वापरासाठी जागा देण्यात येईल. धारावीत एक निर्यात प्रधान केंद्र निर्माण केले जाईल, असं जाहीरनाम्यात नमुद केलं.
याशिवाय, मुंबई महानगरक्षेत्रात ५० हजारांपेक्षा जास्त गृहनिर्माण सोसायट्यांसाठी प्रलंबित कब्जा प्रमाणपत्रे ६ महिन्यात देणार, विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात गृहनिर्माण सोसायट्यांवरील १८ टक्के जीएसटी कमी करून ५ टक्के करण्याचा ठराव पास करु. एसआरए योजना सोपी केली जाईल, महाराष्ट्रात वास्तव्य असणाऱ्या स्थानिक रहिवाश्यांना मुंबईतील नोकऱ्यात प्राधान्य देणार, झोपडपट्टी व मुलींच्या शाळांमध्ये १ रुपयात सॅनिटरी नॅपकीन मिळणारे व्हेंडिंग मशीन लावले जाईल, महिलांसाठी वन स्टॉप क्रायसीस सेंटर, महिलांसाठी सुरक्षित व परवडणारी वसतीगृहे उभारणार, मुंबईत हाताने होणारी साफसफाई थांबवून स्वयंचलित ड्रेन सफाई तंत्रज्ञान व कौशल्य विकास केंद्र स्थापणार, मुंबईतील बुद्ध विहारांना निधी दिला जाईल, अशी आश्वासने देण्यात आली.
मच्छिमारांचे ५ लाखांचे कर्ज माफ
मासळीला चांगली किंमत मिळावी यासाठी मुंबईतील ससून व माझगाव बंदरासह वरळी व वांद्रे येथे मत्स उत्पादन विपणन परिषदेची स्थापना करणार, मच्छिमारांचे ५ लाखांचे कर्ज माफ करणार, कोळीवाड्यातील गावठाण क्षेत्राची विकास कामे प्राधान्याने हाती घेतली जातील, मुंबई पूर्व व पश्चिम उपनगरात एक एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार, यासारखी आश्वासने देण्यात आलेली आहेत. बीएमसीचा निधी अन्यायकारपणे वाटप केला, त्यावर श्वेतपत्रिका काढणार असंही जाहीरनाम्यात म्हटलं आहे.