मुंबई : कंत्राटी नोकर भरतीवरून विरोधकांकडून राज्य सरकारवर सडकून टीका केली जात असून, आता राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना सुनावले आहे. तुम्ही स्वत:ला मोठे नेते म्हणवता. मात्र, तुम्ही पक्ष फोडला. आता कंत्राटी भरतीचे पाप तरी करू नका, असा सल्ला देत वडेट्टीवार यांनी अजितदादांना खडेबोल सुनावले आहे. (Vijay Wadettiwar On Ajit Pawar)
राजस्थानच्या राजकारणात CM शिंदेंची एन्ट्री; भाजपसाठी आव्हान की काँग्रेसची वाट बिकट होणार?
वडेट्टीवार म्हणाले की, राज्य सरकारने 9 खासगी कंपन्यांना कंत्राट देऊन नोकर भरतीचा करण्याचा घाट घातला आहे. त्याबाबतचा आदेशही काढण्यात आला आहे. हे नालायक सरकार राज्यातील तरूणांचे आयुष्य उद्धवस्त करायला निघाल्याचेही वडेट्टीवार म्हणाले. काढण्यात आलेला अध्यादेश मागे घेत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचे आवाहनही वडेट्टीवर यांनी राज्यातील तरूणांना केले आहे.
G20 यशस्वी आयोजन एका व्यक्तीने किंवा पक्षाने केले नाही : PM मोदींनी दिले देशवासियांना श्रेय
तातडीने भरती करण्यासाठी निर्णय
एकीकडे कंत्राटी पद्धतीच्या भरतीवरून विरोधकांचा गदारोळ सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, राज्याच्या काही विभागांमध्ये तातडीने पदभरती करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने विविध विभागांमध्ये कंत्राटी स्वरूपात पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. घेण्यात आलेला कंत्राटी भरतीचा निर्णय कायमस्वरूपी नसून तो तात्पुरत्या स्वरूपाचा असल्याचेही अजित पवार छ. संभाजीनगर येथे म्हणाले होते.
अजित पवार फसणूक करत आहेत
अजित पवारांवरांना सुनावताना वडेट्टीवर म्हणाले की, अजित पवार हे खोटं बोलून राज्यातील लाखो तरूणांना फसवण्याचे काम करत आहेत. त्यांनी या आधी राष्ट्रवादीचे फोडण्याचे काम केले. मात्र, आता तरूणांचे आयुष्य उद्धस्त करण्याचे पाप तरी अजितदादांनी करू नये. स्वतःला मोठे नेते म्हणवून घेत असाल तर, त्यांनी हे पाप करू नये असे वडेट्टीवर यांनी म्हटले आहे.