Baba Siddique Shot Dead: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची गोळ्या मारून हत्या झाली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई गँगनेही हत्या घडवून आणल्याचा संशय असून, या या अँगलने पोलिसांचा तपास सुरू आहेत. त्यात आता नवीन माहितीसमोर येत आहे. बाबा सिद्दीकी यांच्याबरोबर त्यांचा मुलगा काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) या दोघांचीही हत्या घडवून आणण्याचा आरोपींचा प्लॅन होता हे आता समोर येत आहे. त्या अँगलनेही पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या हत्याप्रकरणात मोठा ट्वीस्ट ! आरोपीच्या वयाची चाचणी होणार
शनिवारी रात्री बाबा सिद्दीकी आणि मुलगा झिशान हे वांद्रेतील निर्मलनगरमधील कार्यालयात बसले होते. दसऱ्यानिमित्त फटाके फोडण्यात येत होते. काही जणांनी सिद्दीकी यांना फटाके फोडण्यासाठी बोलविले होते. फटाके फोडल्यानंतर बाबा सिद्दीकी हे घरी जाण्यासाठी कारमध्ये बसले होते. फटाके फुटत असताना सिद्दीकी यांच्या कारजवळ तिघे जण आले. त्यातील तिघांनी सिद्दीकी यांच्यावर बेछूट गोळीबार केला. सिद्दीकी यांच्यावर तब्बल सहा गोळ्या झाडण्यात आल्या. छातीवर गोळीबार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
‘पवारांना फक्त खुर्चीच दिसते’; सिद्दीकींच्या हत्येनंतर राजीनामा मागताच फडणवीसांचा टोला
झिशान सिद्दीकी कसे वाचले ?
आमदार झिशान हे आपला वडिलांबरोबर एकाच गाडीतून घरी जाणार होते. दोघेही आपल्या कार्यालयातून बाहेर आले. त्यावेळी झिशान यांना एक फोन आला. फटाके फुटत असल्याने ते पुन्हा कार्यालयात गेले. ते फोनवर बोलत असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला. त्याचवेळी झिशान हे कार्यालयातून बाहेर आले. त्यावेळी बाबा सिद्दीकी हे जखमी होऊन जमिनीवर पडलेले होते. झिशान यांनी कॉल घेतना नसता, तर हल्लेखोरांना त्यांच्यावरही गोळी झाडली असती, अशी माहिती समोर आली आहे. पकडलेल्या दोन्ही आरोपींकडून 28 जीवंत काडतुसे आढळून आले आहे. त्यावरून त्यांना झिशानलाही संपवायचे होते का या अँगलने पोलिसांची तपास सुरू आहे.
सिद्दीकींना वाय सुरक्षा नव्हती
पंधरा दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांना एक धमकी आली होती. त्यानंतर त्यांना वाय सुरक्षा दिली गेली होती, असे बोलले जात होती. परंतु मुंबई पोलिसांनी अशी सुरक्षा दिलेली नव्हती, असे पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तीन पोलिस कर्मचारी होते, असे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले आहे.