अजितदादांना जलसंपदा की अर्थमंत्री? पाहा राष्ट्रवादीच्या कोणत्या मंत्र्यांना कोणते खाते?

Maharashtra politics : राज्याच्या राजकारणात मोठा भूंकप झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना धक्का दिला आहे. विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत अजित पवार हे 40 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकार सामील झाले आहेत. अजित पवार यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप […]

WhatsApp Image 2023 07 02 At 3.26.04 PM

pawar

Maharashtra politics : राज्याच्या राजकारणात मोठा भूंकप झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना धक्का दिला आहे. विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत अजित पवार हे 40 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकार सामील झाले आहेत. अजित पवार यांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे, हसन मुश्रीफ, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोड, धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

आज सकाळपासून राज्याच्या घडामोडींना चांगलाच वेग आला होता. शरद पवार यांनी राजकारणातून मुक्त होत राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेत पक्षात भाकरी फिरवणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यानंतर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदातून मुक्त करुन मला संघटनेत काम करण्याची इच्छा आहे, असे म्हटले होते.

Ajit pawar : शुक्रवारीच पदाचा राजीनामा दिला; बंडामागचं सत्य उघड करत अजितदादांचा गौप्यस्फोट!

अजित पवारांच्या गटाला मिळणारी संभाव्य मंत्रिपदे कोणती ?
अजित पवार : जलसंपदा किंवा अर्थमंत्री
छगन भुजबळ : अन्न व नागरी पुरवठा
दिलीप वळसे पाटील : ऊर्जा
हसन मुश्रीफ : कौशल्य विकास
धनंजय मुंडे : गृहनिर्माण
आदिती तटकरे : महिला व बालकल्याण
संजय बनसोडे : पर्यटन
अनिल पाटील : लाभक्षेत्र विकास प्राधिकरण
धर्मरावबाबा आत्राम : आदिवासी कल्याण

अजितदादांचा राष्ट्रवादी पक्षावर दावा; आगामी सर्व निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवणार

Exit mobile version