Download App

Sanjay Raut : जे.पी. नड्डांचा मुंबईशी काय संबंध? उगाच लुडबुड करु नये

Sanjay Raut On J.P. Nadda : जे.पी. नड्डा यांना मुंबईबद्दल काय माहिती आहे? त्यांचा मुंबईशी काय संबंध आहे? गौतम अदानीसंदर्भात विरोधी पक्षांनी जे प्रश्न विचारले आहेत त्यावर त्यांनी बोलावं. जे.पी. नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी मुंबईत येऊन लुडबूड करु नये. मुंबई ताब्यात घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. देशाती भ्रष्टाचार, कर्नाटकच्या पराभवाबद्दल बोलावं. शिंदे-फडणवीस सरकराने किती कोटींचा भ्रष्टाचार केलाय तर बोलावं, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जे.पी. नड्डा यांच्यावर केली आहे.

घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने घटनेची चौकीदारी करण्याची जबाबदारी पार पाडायची असते. घटनात्मक पदावर बसलेली व्यक्तीच घटनेला मारेकरी ठरतात. भगतसिंह कोश्यारी यांच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने निश्पक्ष पद्धतीने न्याय करायचा असतो. ही आमची भूमिका आहे. राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. परदेशात आणि इंथ आल्यावर अनेक मुलाखती देत आहेत. त्यातून संभ्रम निर्माण होत आहे. या संपूर्ण प्रकरणावर दबाब निर्माण होतीय की काय असं आम्हाला वाटतंय. विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्यासमोर असलेल्या खटल्यासंदर्भात जाहीर मुलाखती देऊ नयेत असा संकेत आहे, असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला आहे.

Bullock Cart Racing : भिर्रर्र… ! बैलगाडा शर्यतीवर ‘सर्वोच्च’ निर्णय : ग्रामीण भागात आनंदाचं वातावरण

माझ्याविरुद्ध रोज हक्कभंग आणले जात आहेत. या देशातील न्यायव्यवस्था, घटना, लोकशाही, स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. त्यासाठी घटनात्माक पदावर बसलेल्या व्यक्तीचा गैरवापर होतोय. राज्यपाल, विधीमंडळ किंवा संसद हेच जर आपल्या लोकशाहीचे गारदे ठरणार असतील तर त्यासाठी फक्त आमदार, खासदार यांनीच नाही तर सर्वसामान्य माणसांनी आवाज उठवला पाहिजे. लोकशाहीसाठी मी आवाज उठवला असेल आणि त्याबद्दल मला शिक्षा देणार असतील तर माझी तयारी आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाला नडणं भोवलं! किरेन रिजिजू यांची कायदा मंत्रिपदावरून हकालपट्टी

माझ्याविरुद्ध एक हक्कभंग दाखल झालेला आहे. त्यात आरोप आहे की मी विधीमंडळाला चोर मंडळ म्हटले आहे. पण मी विधीमंडळाला चोर मंडळ म्हटलेले नाही. शिवसेनेतून एक गट घटनाबाह्य पद्धतीने फुटून गेला. ते विधीमंडळात गेले आणि सरकार बनवलं. त्यावर सुप्रीम कोर्टाने देखील प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांना विधीमंडळाच्या बाहेर चोर म्हणणं ही माझी भूमिका होती. राज्यसभेच्या सदस्याच्या हक्कभंगाचे विषय राज्यसभेच्या सभापतीकडे जातात. तशे त्या समितीकडे गेले असतील. त्याप्रमाणे मी माझे मत मांडणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Tags

follow us