Download App

Slum Tourism म्हणजे काय? धारावी स्लम ट्युरीझमचं केंद्र कसं बनलं?

Slum Tourism: पावसाळा सुरू झालाय फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही कुठे जाल देश विदेशात डोंगर बर्फाळ प्रदेश आणि ऐतिहासिक वास्तू बघायला जाण्याची तुमची स्वप्न असतील मात्र स्लम ट्युरीझम या बद्दल तुम्ही कधी ऐकलय का? होय झोपडपट्ट्या बघायला जाणे तेथील लोकांचं जीवन पाहणे हे ही एक पर्यटनच आहे. असंच एक स्लम ट्युरीझमचं ठिकाण म्हणजे मुंबईतील अशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी. ही तीच झोपडपट्टी आहे जी कोरोनामध्ये संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरली. तसेच धारावी आणखी एक कारणामुळे चर्चेत आली ती जेव्हा धारावीचा विकास करण्याचं काम अदानी ग्रुपला मिळालं आणि त्यावरून विरोधकांनी जोरदार विरोधही कला. मात्र स्लम ट्युरीझम म्हणजे काय? धारावी स्लम ट्युरीझमचं केंद्र कसं बनलं? लेट्सअप विषय सोपच्या माध्यमातून ( What is Slum Tourism how Dharavi made center of Slum Tourism )

‘ते कायम उघडे पडतात त्यात नवीन काय’; क्लीन चीट मिळताच राहुल कुल यांचा राऊतांवर पलटवार

सुरूवातीला पाहूयात स्लम ट्युरीझम म्हणजे काय?

स्लम म्हणजे झोपडपट्टी आणि याच भागाची सहल किंवा येथील लोकांचं आयुष्य कसं आहे. हे पाहण्यासाठई अनुभवण्यासाठी पर्यटक या झोपटपट्ट्यांना भेटी देतात. तेथे राहतात. यामध्ये विदेशी पर्यटकांचा विशेष करून कल असतो. गरिब राष्ट्र अशी ओळख असलेल्या अफ्रिकी देशांमध्ये 2006 मध्ये एक टूर ऑपरेटर कंपनीने जिवनाचं वास्तव दाखवण्यासाठी या स्लम ट्युरीझमची सुरूवात केली. ज्यामध्ये युगांडा, केनिया, केपटाउन सर्वांत पुढे आहे. भारतापर्यंत पोहचलीय.

जेडीयूने राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनाही पाठवला व्हिप, उपसभापतींना व्हीप लागू होणार का?

खरंतर या ट्युरीझमची सुरुवात ब्रिटिश काळात झाली. असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यावेळी ब्रिटिश लोक त्यांच्या वसाहती असलेल्या गरीब देशांमधील गरीब लोकांचे जीवन कसा आहे. हे पाहण्यासाठी त्यांच्या वस्त्यांमध्ये जाणार मात्र यावर मानव अधिकार संस्थांकडून आक्षेप घेण्यात आला. कारण यातून स्लम ट्युरीझम सुरू झालं. ट्युरिस्ट कंपन्या श्रीमंताकडून यासाठी बक्कळ पैसा आकारत. मात्र त्याचा फायदा झोपडपट्टीतील लोकांना होत नव्हता. तसेच या श्रीमंत लोकांच्या झोपडपट्टीत जाण्याने झोपडपट्टीवासियांमध्ये पैसा कमावण्यासाठी वाईट मार्गांचा वापर करणे ज्यामध्ये चोरी अवैध धंद्यांचे प्रमाण देखील वाढलं होतं.

धारावी स्लम ट्युरीझमचं केंद्र कसं बनलं?

अगोदर पाहूयात मुंबईतील अशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी. निर्माण कशी झाली. 18 व्या शतकात माहिमच्या खाडीत माशेमारी करण्यासाठी आलेले मच्छिमार स्थायिक झाले. नंतर ही खाडी कोरडी पडली मासेमारी बंद पडली. आणि या जागेवर इतर गोरगरिब रहायला आले जे कातडी, मातीचे भांडे, हस्तकलेचं काम करत. हळूहळूनंतर 20 व्या शतकापर्यंत या धारावीचा चेहरा बदलला तेथे शहराप्रमाणे शाळा, धार्मिक स्थळं, हॉस्पिटल सगळं होतं पण धारावी शहर नाही तर झोपडपट्टी बनली.

जवळपास साडेपाचशे एकरमध्ये पसरलेल्या धारावीमध्ये झोपड्यांची संख्या एवढी आहे की, जमीन दिसतच नाही. एका झोपडीमध्ये जवळपास दहा लोक राहतात. यामध्ये स्थलांतरितांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी 2019 च्या निवडणुकीच्यावेळी समोर आलेल्या आकड्यानुसार येथे दीड लाख मतदार आहेत. अल्पवयीन मुलं वेगळी आणि याच झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांचा आयुष्य पाहण्यासाठी विदेशी पर्यटक येतात.

एवढेच नाही तर 2019 च्या ट्रॅव्हल वेबसाईट ट्रीप ॲडव्हायझर हा ट्रॅव्हलर्स चॉईस आवड देखील धारावीला मिळाला होता. हा अवॉर्ड पर्यटकांच्या चॉईसच्या आधारावर दिला जातो. या संस्थेच्या दाव्यानुसार भारतात आल्यानंतर विदेशी पर्यटक ताजमहलपेक्षा धारावीला भेट द्यायाला जास्त प्राधान्य देतात.

यावेळी पर्यटक येथे वास्तव्य देखील करतात. तसेच मातीचे भांडे हस्तक्षेप चामड्याच्या वस्तू यासारख्या गोष्टी ते अत्यंत महाग किंमतीत आठवण म्हणून आपल्यासोबत नेतात. थोडक्यात हे उच्चभ्रू लोक गरीबीचे जीवन अनुभवण्यासाठी पैसे मोजतात. यातून धारावीतील 80 टक्के लोक पैसे कमावतात. त्यांचा टर्नओव्हर 665 मिलियन डॉलर च्या जवळपास आहे. याबद्दल युनिव्हर्सिटी ऑफ लेसिस्टर चे प्रोफेसर यांच्या या पुस्तकात माहिती आहे.

Tags

follow us