Whatsapp : वादावरून कुठे झाला गाेळीबार ?

पुणे : व्हाॅट्सअप (Whatsapp) ग्रुपवर झालेला वाद विकोपाला केला आणि चक्क एका बांधकाम व्यवसायिकाने एकावर गोळीबार (Firing) केला. पुण्यातील (Pune) सिंहगड रस्ता परिसरात आज (दि.२४) राेजी ही घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये रमेश राठोड हे जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी संतोष पवार (रा. बावधन, पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले […]

Images

whatsapp pin feature

पुणे : व्हाॅट्सअप (Whatsapp) ग्रुपवर झालेला वाद विकोपाला केला आणि चक्क एका बांधकाम व्यवसायिकाने एकावर गोळीबार (Firing) केला. पुण्यातील (Pune) सिंहगड रस्ता परिसरात आज (दि.२४) राेजी ही घटना घडली आहे.

या गोळीबारामध्ये रमेश राठोड हे जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी संतोष पवार (रा. बावधन, पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रमेश राठोड, संतोष पवार आणि देवा राठोड आणि अन्य काहीजण सिंहगड भागातील सनसिटी योगीराज ऑटो गॅरेज येथे गप्पा मारत बसले होते. तेव्हा देवा राठोड यांनी त्यांच्या एका व्हाट्सअप ग्रुप वर संतोष पवार यांच्याबद्दल टिप्पणी केली. यावरून या दोघांमध्ये वाद वाढला आणि दोघांमध्ये चांगलीच बचाबाची झाली.

या भांडणामध्ये रमेश राठोड यांनी भाग घेतल्याने रागावलेल्या पवार यांनी आपले कमरेचे पिस्तूल काढून रमेश राठोड यांच्या दिशेने झाडले. यामध्ये राठोड यांच्या पायाला गोळी लागल्याने दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलीस रस्ता परिसरातील पोलीस ठाण्याचे पोलीस वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोचले असून पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, संतोष पवार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूल आहे. शिवाय त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्यासोबत एक पोलीस कर्मचारी देखील असतो. मात्र तरीदेखील त्यांनी राठोड यांच्यावर गोळी झाडली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Exit mobile version