Download App

राजकीय वारसदार कोण, या प्रश्नावर अजितदादा म्हणाले…

मुंबई : रोहित पवार (Rohit Pawar) आणि पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या रुपाने पवार कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे. रोहित पवार सध्या कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानंतर रोहित पवार हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालेले आहेत अशी चर्चा होती. त्याचवेळी 2019 च्या पराभावातून धडा घेऊन पार्थ पवार देखील 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत. पार्थ पवार यांना अजित पवार (Ajit Pawar) यांचे राजकीय वारसदार म्हणून पाहिले जात आहे. याच विषयावर अजित पवार यांनी एका मुलाखतीत भाष्य केले आहे.

अजित पवार म्हणाले, कोणीच कोणाला राजकीय वारसदार करत नाही. मी राजकारणात आलो त्यावेळी पवार साहेब राजकारणात होते. बाकीचे आपणआपल्या व्यावसायात रमलेले होते. आमच्या पिढीत मी सुरुवातीला राजकारणात आलो. घरच्यांनी सुरुवातीला विरोध केला होता. पण मला आवड होती. माझ्यानंतर काही वर्षांनी सुप्रीया आली. ती तिच्या परीने काम करते. लोकसभेत बेस्ट संसदपटू म्हणून नेहमीच नावाजले जाते. ती तिचे काम करते मी माझं काम करतो आहे. आता आमच्या पुढच्या पिढीत रोहितला आवड होती. त्याने त्याचा मतदारसंघ निवडला. तिथं त्याने काम केलं आणि त्यातून तो निवडून आला, असे अजित पवार यांनी सांगितले.

Santosh Khade… माय-बापाचा कोयता बंद करण्यासाठी एमपीएससी पास झालो!

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे शिर्डीला शिबीर झाले होते. त्या शिबीरातून अजित पवार अचानक गायब झाल्याची राजकीय चर्चा होती. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, आम्ही भावंडांनी बालीला जायचं ठरवलं होत. त्या तारखा तीन महिन्यांपूर्वी बुक झालेल्या होत्या. त्यावेळी आमचं ठरलं होतं की काही झालं तरी रद्द करायचं नाही. पहिल्या दिवशी हजर होतो आणि मार्गदर्शन केलं. शिबीर संपल्यावर तिथून थेट विमानतळावर आलो. त्यामुळे मला तिथं हजर राहता आले नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

गेल्या काही दशकांपासून राज्याच्या राजकारणात अजित पवार नावाचा राजकीय दबदबा तयार झाला आहे. स्वपक्षातील नेते तसेच विरोधी पक्षातील नेते देखील सहसा त्यांच्याशी पंगा घेत नाहीत. राष्ट्रवादीमध्ये गटतट निर्माण होणार नाहीत याची पुरेपुर काळजी शरद पवार यांनी घेतली आहे. सुप्रिया सुळेंची केंद्रात आणि अजित पवार यांची राज्याच्या राजकारणात सोय करुन ठेवली आहे. त्यामुळे रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्यात देखील असेच ठरले आहे का? याची नेहमीच चर्चा असते.

Tags

follow us