Santosh Khade… माय-बापाचा कोयता बंद करण्यासाठी एमपीएससी पास झालो!
बीड : बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट या गावातील युवकाने लाल दिव्यासाठी नाही तर ऊसतोड कामगार असलेल्या पण बैलासारखे राबणाऱ्या माय-बापाच्या हातातला कोयता सोडवण्यासाठी काय करता येईल. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची ठरवले. ध्येयाने झपाटून कष्ट करत अभ्यास केला. केवळ दुसऱ्याच प्रयत्नात एमपीएससीमध्ये राज्यात टॉपर आला आहे. सावरगाव घाट येथील संतोष खाडे या तरुणाची थक्क करणारा हा प्रवास राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.
ऊसतोड करणाऱ्या मजुरांबरोबर त्यांची लहान मुले ही हे काम करत आहेत. त्यामुळे बालकामगार कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे केली पाहिजे. त्यांच्यासाठी बाल वस्तीगृह खोलले पाहिजे. मला ऊसतोड कामगारांसाठी आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आणि त्याच्या शिक्षणासाठी जे-जे काय करता येईल ते मी करणार आहे, असे संतोष खाडे यांनी सांगितले.
खरंतर माझे आई-वडील अशिक्षित आहेत. त्यामुळे लहानपणापासून ऊसतोडी हाच त्यांचा मुख्य व्यवसाय करत होते. त्यामुळे सावरगाव घाट येथील जिल्हा परिषद शाळेत माझं शिक्षण झाले. त्यानंतर मी एक वर्ष आश्रम शाळेमध्ये राहिलो. त्यानंतर काही वस्तीगृहाच्या माध्यमातून सहावी आणि सातवीला मी वस्तीग्रहमध्ये भामेश्वर विद्यालय पाटोदा या ठिकाणी राहिलो. मग परत मी माझ्या मूळ गावी सावरगाव घाट येथे भगवान महाराज विद्यालय या ठिकाणी मी पूर्ण केलं. त्यानंतरच माझं पदवीच शिक्षण बीड येथून पूर्ण केले आहे. मी काम करतच शिक्षण पूर्ण केले आहे.
https://letsupp.com/maharashtra/big-braking-anil-jayshinghani-shivsena-uddhav-thackeray-varun-sardesai-25028.html
२०२० ची माझी पहिली राज्यसेवा परीक्षा होती. मी पूर्व परीक्षा पास झालो. मी मुख्य परीक्षेला पात्र झालो. परंतु, ०.७५ मार्क मला कट ऑफ पेक्षा कमी असल्यामुळे माझी पोस्ट गेली. परंतु, मला पोस्ट मिळू शकली नाही, असे सांगत संतोष खाडे यांनी सांगितले की, मला पोस्ट मिळण्याची किंवा लाल दिव्याच्या गाडीत जाण्याची किंवा अधिकारी होण्याची किंवा पगार मिळवण्याची अपेक्षा अशी कधीच नव्हती. तर माझ्या आई वडिलांना ऊस तोडायला जाणे बंद करायचे होते. त्यामुळे मग पुढची राज्यसेवेची मुख्य परीक्षा झाली. त्यात मी पास झालो. एनटी-डी वर्गातून राज्यात पहिला आलो आहे. अद्याप कोणती पोस्ट मिळाली आहे, हे समजलेले नाही. लवकरच आयोगाकडून कळवणार आहेत.
संतोष खाडे म्हणाला की, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांना सांगेल की, प्लॅन-बी असायलाच पाहिजे. पण मी का प्लॅन-बी केला नव्हता. कारण बारावीनंतरच मी ठरवलं होतं की मला एमपीएससीमध्येच करियर करायचे आहे. त्यामुळे मी बारावी पासून तयारी करत होतो. जरी मी राज्यसेवा मधून कोणतीही पोस्ट काढू नाही शकलो. तरी पण कम्बाईन ग्रुपमधून मी पीएसआय-एसटीआय नक्की होईल. कारण मी २०१९ पासून झालेल्या सर्व ग्रुपच्या पूर्व परीक्षा पास झालो होतो.