पुणे : राज्य उत्पादन शुल्काच्या तळेगाव दाभाडे विभागाने शुक्रवार (दि. २७) सकाळी मोठी कारवाई केली आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील उर्से गावाच्या हद्दीत सापळा रचून गोवा राज्यातील निर्मित विदेशी मद्यावर राज्य उत्पादन शुल्काने कारवाई केली आहे.
दरम्यान, या कारवाईमध्ये सुमारे ६२ लाख ६८ हजार रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी गामित सोमवेलभाई सिंगाभाई (वय २५) व्यवसाय ट्रकचालक (रा. ओटा ता. सोनगड जि. तापी गुजरात), मोहन दिनराम खथात (वय ३४) व्यवसाय-ट्रकवाहक (रा- रुध्रपुरा ता. हुरडा जि. भिलवाडा, राजस्थान) यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. यामुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर काही प्रमाणात जरब बसवण्यात राज्यशुल्क उत्पादन विभागाला यश येत आहे.