आमच्याकडे आमदार बनवणारा देव असल्याचं म्हणत साताऱ्याचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला डिवचलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची बैठक पार पडत आहे. अजित पवार गटाची एमआईटी इन्स्टिट्यूटमध्ये तर शरद पवार गटाची वाय. बी. सेंटरमध्ये बैठक पार पडत आहे. शरद पवारांच्या बैठकीत शिंदे बोलताना त्यांनी अजित पवार गटाला डिवचलं आहे.
MS Dhoni: माहीच्या आयुष्यावर नवा सिनेमा; कोण साकारणार धोनीचा रोल? चाहते उत्सुक
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, शरद पवारांच्या आधीच्या बैठकीला व्यासपीठावर जागा मिळत नसायची. आता आमदार बनवणारा देवच आमच्याकडे आहे. या बैठकीला अनेक संघर्षाचा सामना, तुरुंग भोगणारे नेते, कसलीही तमा न बाळगता उपस्थित झाले आहेत. विशेषत: ईडीला न घाबरणारे नेते अनिल देशमुखही शरद पवारांच्या मागेच उभेच असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Maharashtra Politics : ‘शिंदेंची मानसिक स्थिती बिघडली, ‘वर्षा’ बंगल्यातील शस्त्रे जप्त करा’
यावेळी बोलताना शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही भाष्य करीत सवाल केला आहे. ते म्हणाले, मी देखील एक शिंदेंच आहे, आधी अजित पवारांमुळे, तुम्ही हिंदुत्व, बाळासाहेबांचं विचार घेऊन भाजपशी युती केली, आता तेच तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेत, आता कुठे जाणार? असा सवाल शशिकांत शिंदे यांनी केला आहे.
नाशिकमध्ये राष्ट्रवादी कार्यालयासमोरच दोन्ही पवारांचे समर्थक भिडले…
अजित पवारांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता हे सरकार ट्रिपल इंजिन असल्याचं म्हटलं होतं. तुमच्या ट्रिपल इंजिनच्या ड्रायव्हरचा आम्ही शोध घेत आहोत, ज्यांच्यामुळे तुम्ही युती तोडलीय, त्यांच्याशीच युती कशी करता? असा सवाल शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे पुढील काळात केंद्रीय मंत्री अमित शाहांनी तुमचाच धमाका करु नये, म्हणजे झालं, या शब्दांत शशिकांत शिंदेंनी टीकेची तोफ डागलीय.
राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंपच झाला आहे. अजित पवारांच्या या कृतीला समर्थन न देता सत्ताधाऱ्यांविरोधात दंड थोपटत शरद पवार मैदानात उतरले आहेत. फुटीनंतर दोन्ही गटांकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. एवढंच नाहीतर दोन्ही गटाकडून प्रदेश कार्यकारिणीची घोषणाही करण्यात आली आहे.
एकंदरीत संपूर्ण घडामोडींनतर आज राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची बैठक पार पडत आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची माजी मुख्यमंत्री य़शवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक सुरु आहे. तर अजित पवार गटाची एमआईटी इन्स्टिट्यटमध्ये सुरु आहे. या दोन्ही बैठकीमध्ये दोन्ही गटांच्या नेत्यांकडून टीका-टीप्पण केली जात आहे.