नाशिकमध्ये राष्ट्रवादी कार्यालयासमोरच दोन्ही पवारांचे समर्थक भिडले…

नाशिकमध्ये राष्ट्रवादी कार्यालयासमोरच दोन्ही पवारांचे समर्थक भिडले…

Nashik NCP : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (ajit pawar)यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर अजितदादांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये (NCP)उभी फूट पडली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता नाशिकमधील (Nashik)राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांसमोर आले आहेत. राज्यभरातील राष्ट्रवादीची कार्यालये नेमकी कोणाची यासाठी आता चढाओढ सुरु झाली आहे. त्यातच आता नाशिकमधील शरद पवार यांचे समर्थक आणि अजित पवार, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)समर्थक राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर आक्रमक झाले आहेत. शरद पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादी कार्यालयात बैठक घेण्यावर ठाम आहेत. त्यामुळे येथील वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.(sharad pawar ajit pawar supporter conflict in Nashik NCP party office )

Sunil Shelke : सत्तेत जायचं हे सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीतच ठरलं, आमदार शेळकेंचा खळबळजनक गौप्यस्पोट

शरद पवार गटाचे पदाधिकारी राष्ट्रवादी कार्यालयामध्ये बैठक घेण्यावर ठाम आहेत तर दुसरीकडे अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या गटाचे पदाधिकारी यांनी कार्यालयात बैठक घेऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या ठिकाणचं वातावरण चांगलंच तापलं आहे.

अखेर पवारांनी हत्यार उपसलं; ज्यांनी द्रोह केला त्यांनी मी जीवंत असेपर्यंत…

राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित बैठकीला अजितदादा अन् छगन भुजबळ गटाने विरोध केल्यामुळे शरद पवार गटदेखील आक्रमक झाला आहे. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी अजित पवार गटाकडून अजित दादांच्या समर्थनार्थ तर शरद पवार गटाकडून शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

NCP Political Crisis : काळजावर दगड ठेवून काही निर्णय घ्यावे लागतात… लंकेचे सूचक विधान

राष्ट्रवादीत शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट झाले आहेत. त्यातच आता अजितदादांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आपल्यालाच मिळणार असल्याचेही सांगितले. त्यातच आता शरद पवारांनीही आपला गद्दारी करणाऱ्यांनी आपला फोटो वापरु नये, असं ठणकावलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमधील राजकीय मतभेद प्रकर्षाने समोर येत आहेत. त्यातच आता नाशिकमधील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांसमोर आले आहेत.

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांसमोर आल्याने नाशिक पोलिसांनी संभाव्य कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. यावेळी दोन्ही गट आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे. आज सकाळीच छगन भुजबळ समर्थकांनी राष्ट्रवादीचे कार्यालय ताब्यात घेतले. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड (शरद पवार गट) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. आज नाही तर उद्या आम्ही कार्यालय ताब्यात घेऊ, असंही यावेळी म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube