NEET ची परीक्षा, लष्कराची सुरक्षा! ‘भारतीय लष्कराला पाचारण करणार’, शिक्षणमंत्र्यांची घोषणा…
येत्या 22 जूनला होणाऱ्या नीट परीक्षेसाठी भारतीय लष्काराला पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलीयं.
Neet Exam Paper Leak : नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणात (Neet Exam Paper Leak) मोठी अपडेट समोर आलीयं. येत्या 22 जूनला होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी भारतीय लष्कराला पाचारण करण्यात येणार असल्याची घोषणच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra pradhan) यांनी केलीयं. नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी आज नीट परीक्षा पॅनल आणि केंद्रीय मंत्र्यांची मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी माध्यमांशी संवाद साधलायं. आता नीट परीक्षेचा पेपर पोहोचवण्यासाठी वायुदलाची मदत घेणार असल्याचंही प्रधान यांनी स्पष्ट केलंय.
पूर्वी एक झोप झाली की, मिळायचा ‘हाफ टाईम’ मग, आपण झोपेच्या 8 तासांच्या चक्रात कसे अडकलो?
पुढे बोलताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, आता नीट परीक्षेसाठी लष्कराला पाचारण करण्यात येणार आहे. येत्या 22 जूनला होणारी फेरपरीक्षेसाठी पेपर पोहोचण्यापासून ते जाण्यापर्यंत वायुदलाची मदत घेण्यात येणार आहे. पेपर लिक प्रकरणांना आळा घालण्यासाठी आजच्या बैठकीत केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला असल्याचंही प्रधान यांनी स्पष्ट केलंय.
तसेच नीट पेपर लिक प्रकरणी उपाययोजना करण्यासाठी सरकार कटीबद्ध असून नियोजित परीक्षेसाठी घेतलेले विद्यार्थ्यांचे पैसे पुन्हा परत करणार आहोत. तर परीक्षा केंद्र बदलण्यासाठी पर्याय दिले असून परीक्षा केंद्रात सर्वच राज्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्याची व्यवस्था करण्याचं आवाहनही सर्वच राज्यांना करण्यात येणार असल्याचंही प्रधान यांनी स्पष्ट केलंय.