मनोज जरांगेंनी उन्हात नाही, कपडे काढून… जरांगेंच्या निर्णयावर वाघमारेंचा टोला

Navnath Waghmare Criticise Manoj Jarange जरांगेंच्या उपोषणाच्या निर्णयावरून ओबीसी नेते नवनाथ वागमारे यांनी टोला लगावला आहे.

Navnath Waghmare Criticise To Manoj Jarange

Navnath Waghmare Criticise to Manoj Jarange on his hunger strike for Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 मे पासून मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी आज राज्य सरकारला दिला आहे, यावेळी ते उपोषण हे कडक उन्हात, विना मंडपचे करणार आहे, कारण सरकारने आतापर्यंत बरेच उपोषण पाहिले मात्र हे उपोषण वेगळं असणार आहे, यावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं आहे की, जरांगेनी बरेच उपोषण केले ते सगळे मॅनेज उपोषण केले. आता जरांगे यांनी उघडं बसून आमरण उपोषण करावे असा टोला सुद्धा यावेळी वाघमारे यांनी लगावला आहे.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे 8 वा श्रीमद् भागवत भक्ती कथा ज्ञानयज्ञ महोत्सव

कारण मनोज जरांगे ला एसी शिवाय करमत नाही. दोन-तीन तासानंतर उपोषणाला बसल्यावर हा सलाईन लावतो. हा सलाईन योद्धा आहे ,हा मॅनेज योद्धा आहे. त्यामुळे जरांगेंनी कुठलंही उपोषण केलं तर आता काही फरक पडणार नाही. जरांगे म्हणतो की, आम्ही आरक्षणाचा लाभ घेतला व घेत आहे. त्याचा फायदा किती मराठ्यांना झाला, किती गरीब लेकरा बाळांना झाला. याचे सुद्धा जरांगेंनी स्पष्टीकरण द्यावं.

दादरच्या मराठी डॉक्टरांची ऐतिहासिक झेप; डॉ. नितीश राऊत ब्रिटनमध्ये महापौरपदी विराजमान

कारण हा जो जरांगे आहे. हा फक्त निजामी मराठ्यांसाठी काम करतो. तसेच जरांगे म्हटला आहे की, जे मराठ्यांचे आमदार ,खासदार, मंत्री आहेत. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लागून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा मात्र तसं होऊ शकत नाही. कारण जे संविधानात आहे. तेच होईल इतर काही होऊ शकत नाही. त्यामुळे जरांगे हा उपोषण करता योद्धा नसून हा मॅनेज योद्धा आहे, असा टोला सुद्धा त्यांनी जरांगेवर लगावला आहे.

follow us