Women Angree on Minister Girish Mahajan in Mumbai Rally for Women Reservation bill : महिला आरक्षण विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत महिलांना एकत्रित आणण्याची मोठी घोषणा केली आहे. यासाठी भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून विविध मोर्चे काढले जात आहेत. त्यामध्ये भाजपकडून महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईतील वरळी येथे मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी ट्रॅफिक जॅम झाली होती. त्यावेळी संतप्त झालेल्या महिलेने थेट मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारला.
नेमकं काय घडलं?
भाजपकडून महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईतील वरळी येथे मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये मंत्री गिरीष महाजन यांच्या नेतृत्त्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्च्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाले होते. त्यामुळे असंख्य गाड्या एकाच जागी ठप्प होत्या. त्यामुळे या ट्रॅफिकला वैतागलेल्या एका महिलेने गाडीतून उतरत थेट मोर्चामध्ये असलेल्या मंत्री गिरीष महाजन यांना गाठलं.
यावेळी या महिलेने मंत्री गिरीष महाजन यांना झाप झाप झापलं. तिने म्हटलं की, Get Out from here… ही ट्रॅफिक हटवा. तुमचं हे काय चाललं आहे? इथून निघून जा. दरम्यान शांत राहण्याचा सल्ला देणाऱ्या पोलिसांना देखील तिने खडसावलं की, ट्रॅफिक जाम झालेले असताना तुम्ही काय बघत आहात. ही ट्रॅफिक हटवा.
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपची आज बैठक, ‘ही’ 12 नावं चर्चेत; कुणाला मिळणार उमेदवारी?
दरम्यान या महिलेचा व्हिडीओ सध्या माध्यमांसह सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी महिलेचं कौतुक करत भाजपवर सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर काँग्रेस नेत्यांनी देखील यावर टीका केली. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून महिलांची दिशाभूल करणाऱ्या आणि त्यांना केवळ राजकीय साधन म्हणून वापरत खोटे नॅरेटिव्ह पसरवणा-या भाजपाचा खरा चेहरा या भगिणीने वरळीहून निघालेल्या मोर्चासमोर जाऊन उघडा पाडला आहे.

महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून महिलांची दिशाभूल करणाऱ्या आणि त्यांना केवळ राजकीय साधन म्हणून वापरत खोटे नॅरेटिव्ह पसरवणा-या भाजपाचा खरा चेहरा या भगिणीने वरळीहून निघालेल्या मोर्चासमोर जाऊन उघडा पाडला आहे.

महिला आरक्षणाच्या आडून… pic.twitter.com/XqsPfhZY9c
— Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) April 21, 2026

महिला आरक्षणाच्या आडून संविधान आणि निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याचा भाजपाचा डाव ‘इंडिया’ आघाडीने आधीच हाणून पाडला होता. त्यानंतर आता मोर्चे आणि प्रचाराच्या माध्यमातून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू होता; मात्र या धाडसी भगिनीने तोही डाव उधळून लावला आहे.आज फक्त मंत्री गिरीष महाजन यांना पळवून लावले आहे. येणाऱ्या काळात देशातील महिला अशाच प्रकारे भाजपाला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपा भगाओ, देश बचाओ!