पुणे: पुण्यात धायरी परिसरातील (pune crime) जादूटोण्याच्या अघोरी पुजेच्या घटनेची महिला आयोगाने दखल घेतली आहे. त्यांनी यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत ही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
पुण्यात मूलं होत नसल्याने महिलेला मानवी हाडांची राख खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. विद्येचे माहेरघर, असलेल्या पुण्यातील हा प्रकार निंदनीय आणि अमानवी कृत्य आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची स्वाधिकारे दखल घेतली असून सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना तातडीने कार्यवाही करत आयोगास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, असे ट्विट रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
पुण्यात मुल होत नसल्याने महिलेला मानवी हाडांची राख खावू घातल्याचा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. विद्येचे माहेरघर, जागतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यातील हा प्रकार निंदनीय, अमानवी आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची स्वाधिकारे दखल घेतली असून सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या 1/2 pic.twitter.com/72SyZ8mIre
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 19, 2023
पुण्यात जादूटोण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांना रोखण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. या संदर्भात काही आढळलं तर तक्रार करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. मात्र तरीही हे प्रकार सतत सुरु असल्याचे समोर येत आहे. या घटनांमुळे महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे या धक्कादायक घटनेची महिला आयोगाने दखल घेतली आहे, आणि तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी अशी घटना वैकुंठ स्मशानभूमीत समोर आली होती. यावेळी पोलिसांनी अघोरी प्रकार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.