Download App

मुंबई पोलिसांना कोर्टाचा झटका; वरळी ‘हिट अँड रन’ प्रकरणात राजेश शाहाला जामीन मंजूर

15,000 रुपयांच्या रोख जामीनवर शिवेरी न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे.

  • Written By: Last Updated:

मुंबई : वरळी ‘हिट अँड रन’ प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून आरोपी राजेश शाहा यांना कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. 15,000 रुपयांच्या रोख जामीनवर शिवेरी न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. (Worli Hit & Run Case Accused Rajesh Shah Granted Bail By Sewree Court )

नेमकी घटना काय?

वरळीत रविवारी (7 जुलै) पहाटे 5:30 वाजता एक कोळी दाम्पत्य मासे आणण्यासाठी बाहेर पडलं होतं. त्यावेळी वरळीतील अॅट्रीया मॉल जवळ त्यांना मासे घेऊन परतत असताना एका फोरव्हिलरने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेमुळं ते दोघेही कारच्या बोनटवर पडले. वेळीच नवऱ्याने बोनटवरून बाजूला उडी टाकली. मात्र महिलेला बाजूला होता आलं नाही. तर अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने गाडी पळवली. त्यात कोळी महिलेला त्याने फरफटत नेले. यात त्या महिलेचा मृत्यू झाला.

या अपघातात कार चालक पळून गेला होता. कोळी महिलेला उपचारासाठी नायर रुग्णालयात नेले असता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी वरळी पोलिसांनी तपासादरम्यान शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा आणि राजेंद्रसिंह बिदावत यांना अटक केली होती. राजेश शाह हे आरोपी मिहिर शाहचे वडील असून, मिहीर हा अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी असून, तो अद्याप फरार आहे.

मी मुख्यमंत्री असेपर्यंत अन्याय होऊ देणार नाही

वरळीतील घटनेत मुख्य आरोपी अद्याप फरार असून, मुंबई पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. याबाबत बोलताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्याच्या जनतेला मी राज्याचा मुख्यमंत्री असेपर्यंत कोणालाही, मग तो श्रीमंत असो, प्रभावशाली असो, किंवा नोकरदार किंवा मंत्र्यांची मुलं असो, किंवा कोणत्याही पक्षाशी संबंधित असो, त्याला वाचवले जाणार नसल्याचे सांगत मी कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.

 

महाराष्ट्रात वारंवार हीट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने मी अत्यंत चिंतेत आहे. धनदांडग्या आणि राजकारणी लोकांकडून पदाचा गैरवापर केला जात आहे. मात्र माझं सरकार हे सहन करणार नाही. सर्वसामान्यांचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे हीट अँड रनची प्रकरण गांभीर्याने हाताळण्यात यावी पिडीतांना न्याय मिळावा. यासाठी मी पोलिसांना निर्देश दिले आहेत. त्याची कठोर अंमलबजावणी देखील सुरू आहे.

follow us