हिट अॅंड रन प्रकरण : पीडितेच्या कुटुंबाला CM फंडातून 10 लाखांची मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

हिट अॅंड रन प्रकरण : पीडितेच्या कुटुंबाला CM फंडातून 10 लाखांची मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

Worli hit and run case : रविवारी (दि. 7 जुलै) रोजी मुंबईतील वरळी परिसरात (Worli hit and run case) एका भरधाव कारने महिलेला चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली. या भीषण अपघातात कावेरी नाखवा (Kaveri Nakhwa) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी पुढे येत होती. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मुख्यमंत्री सहायता निधीतून पीडित कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

10 लाखांपेक्षा कमी किंमत, फर्स्ट क्लास फीचर्स अन् शानदार मायलेज, ‘ह्या’ कार्स एकदा पहाच 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतील कोस्टल रोडची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना वरळी दुर्घटनेबाबत विचारणा केली असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही पीडितेच्या कुटुंबासोबत आहोत. त्यांना जी काही मदत लागेल, मग ती कायदेशीर असो वा आर्थिक, त्यांना मदत केली जाईल. त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असं सीएम शिंदे म्हणाले.

विरोधकांना आरक्षणाचा प्रश्न चिघळत ठेवायचा; सर्वपक्षीय बैठकीला दांडी मारल्याने शंभुराज देसाईंचे टीकास्त्र

पुढं बोलतांना ते म्हणाले की, पहिल्या दिवसापासून मी वरळी हिट अँड रन प्रकरणातील दोषींवर आणि रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पब आणि बारवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पुण्याच्या प्रकरणातही मी असेच आदेश दिले होते. त्यांनंतर झालेली कारवाई सर्वांनी पाहिली. वरळी प्रकरणातही कारवाई सुरू आहे. जे अवैध काम करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही शिंदे म्हणाले.

मिहीर शाहला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान, मिहीर शाहला न्यायालायाने 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, अपघातानंतर मिहीरला पळून जाण्यात मदत करण्याचे आरोप असणारे शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांनादेखील एकनाथ शिंदेंनी दणका देत त्यांची उपनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी अधिकृत पत्रक काढत शिवसेना उपनेते पदावरून राजेश शहा यांना कार्यमुक्त केल्याचे स्पष्ट केले आहे.

नेमकी घटना काय?
वरळीत रविवारी (7 जुलै) पहाटे 5:30 वाजता एक कोळी दाम्पत्य मासे आणण्यासाठी बाहेर पडलं होतं. त्यावेळी वरळीतील अॅट्रीया मॉल जवळ त्यांना मासे घेऊन परतत असताना एका फोरव्हिलरने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेमुळं ते दोघेही कारच्या बोनटवर पडले. वेळीच नवऱ्याने बोनटवरून बाजूला उडी टाकली. मात्र महिलेला बाजूला होता आलं नाही. तर अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने गाडी पळवली. त्यात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज