विरोधकांना आरक्षणाचा प्रश्न चिघळत ठेवायचा; सर्वपक्षीय बैठकीला दांडी मारल्याने शंभुराज देसाईंचे टीकास्त्र

विरोधकांना आरक्षणाचा प्रश्न चिघळत ठेवायचा; सर्वपक्षीय बैठकीला दांडी मारल्याने शंभुराज देसाईंचे टीकास्त्र

Shambhuraj Desai : मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात (OBC reservation) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी (09 जुलै) बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे विरोधी पक्षाने पाठ फिरवली. त्यामुळं सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर जोरदार टीका होत आहे. तर मविआला विश्वासात न घेतल्याने विरोधकांनी त्यावर बहिष्कार घातल्याचे म्हटलं होतं. दरम्यान, आता मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनीही विरोधकांवर जळजळीत टीका केली.

IAS पूजा खेडकर : अपंग अन् नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट मिळालंच कसं? सामाजिक कार्यकर्त्याची चौकशीची मागणी 

विरोधकांना राज्यात शांतता नांदू द्यायची नाही, त्यांना राज्यात आरक्षणाचा प्रश्न चिघळत ठेवायचा आहे, अशी बोचरी टीका देसाईंनी केली.

विरोधकांना मराठा आणि ओबीसींचं देणंघेणं नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुती सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत 10 टक्के आरक्षण दिले आहे. विशेष म्हणजे हे आरक्षण देत असतांना OBC समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठवाड्यातील काही नेत्यांकडून होत असल्याने राज्यात गोंधळ निर्माण झाला आहे. या प्रश्नी दोन्ही समाजात सौहार्दाचे वातावरण राहावे ही सरकारची भूमिका आहे. विरोधकांना मराठा आणि ओबीसी समाजाबाबत काही देणंघेणं नाही, म्हणूनच त्यांनी सरकारने बोलावलेल्या चर्चेकडे पाठ फिरवली, अशी टीका देसाईंनी केली.

‘समृद्धी’त मोठा भ्रष्टाचार, मोपलवारांनी कमावली 3 हजार कोटींची संपत्ती; रोहित पवारांचा गंभीर आरोप 

विरोधकांची भूमिक दुटप्पी
महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीला दांडी मारली. यामागे त्यांचा उद्देश काय आहे? महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना सर्वपक्षीय बैठकीचे लेखी निमंत्रण देण्यात आले होते. त्याच बरोबर संबंधित विभागाकडून या नेत्यांना फोनवरून बैठकीची माहिती देण्यात आली होती. मुंबईत येणं ज्यांना शक्य नाही, अशांसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, मात्र संध्याकाळी 6 वाजता विरोधकांनी निरोप दिला की, बैठकीला येणार नाही. यावरून विरोधकांची दुटप्पी भूमिका दिसून येते, असं शंभूराज देसाई म्हणाले.

दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल विरोधकांनी मराठा समाजाची माफी मागायला हवी, अशी मागणीही देसाईंनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज