चार वेळा CM राहिलेल्या नेत्याने मराठा आरक्षणावर ‘ब्र’ शब्दही काढला नाही, विखेंचा पवारांवर हल्लाबोल

चार वेळा CM राहिलेल्या नेत्याने मराठा आरक्षणावर ‘ब्र’ शब्दही काढला नाही, विखेंचा पवारांवर हल्लाबोल

Radhakrishna Vikhe Patil On sharad pawar : मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) ओबीसी आरक्षणातून (OBC reservation) मराठा समाजाला आरक्षण देण्याची आणि सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. त्यासाठी त्यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतची मुदत दिली. दरम्यान, याच आरक्षणाच्या मुद्यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शरद पवारांचे (Sharad Pawar) नाव न घेता त्यांच्यावर जोरदवर हल्लाबोल केला.

मोठी बातमी! मराठा आरक्षणावरील सुनावणी तहकूब; 5 ऑगस्टपासून नियमित सुनावणी 

लोकांना झुलवत ठेवणे हे षडयंत्र आहे. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने कधी मराठा आरक्षणावर ब्र काढला नाही. कधी मोर्चात दिसले नाहीत, अशा शब्दात त्यांनी पवारांवर हल्लाबोल केला.

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून आज विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करता आरक्षणाचा मुद्द निकाला काढायाच नाही, असं सांगून एकमेकांकडे बोट दाखवलं. यावेळी मंत्री विखेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केला. ते म्हणाले, अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने आज मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल कधी ब्र शब्द काढला नाही, कधी ते मराठा समाजाच्या मोर्च्यात दिसले नाहीत. मराठ्यांच्याबद्दल कधी सकारात्मक भूमिका घेतली नाही. खंर म्हणजे यापूर्वी सरकारने दिलेलं मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. 2014 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणाच्या विधेयकाचं रुपांतर केलं. ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकलं. पण महाविकास आघाडीच्या काळात त्यांचे मुख्यमंत्री फक्त फेसबुकवर होते. यामुळे ते आरक्षण गेलं, असा आरोप विखेंनी केला.

पवारांनी फोडला भाजपचा मोहरा; अजितदादांच्या आणखी एका शिलेदाराविरोधात ‘कडेकोट’ मोर्चेबांधणी 

विरोधक समाजाचा विश्वासघात करत आहे. हा समाज तुम्हाला माफ करणार नाही, असंही विखे म्हणाले.

पुढं बोलतांना ते म्हणाले, फक्त समाजा-समाजात दुही माजवायची. समाजाच्या विकासाकरता कुणी भूमिका मांडयाची नाही. त्यामुळे मी या निमित्ताने मनोज जरांगे पाटील यांना आवाहन कतो की, या आरक्षणाचे खरे शत्रू कोण आहेत आणि आरक्षण कोण देत नाहीत हे त्यांनी ओळखलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांनी अशा लोकांचे गावबंद केलं पाहिजे, असं विखे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज