मागणी मान्य होईल वाटत नाही, आता आम्ही ताकदीने..,; मनोज जरांगेंनी क्लिअर सांगितलं

मागणी मान्य होईल वाटत नाही, आता आम्ही ताकदीने..,; मनोज जरांगेंनी क्लिअर सांगितलं

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj jarange Patil) यांचा मागील 10 महिन्यांपासून लढा सुरु आहे. आरक्षणाची मागणी पूर्ण होण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 13 जुलैपर्यंत अल्टिमेटम दिलायं. मात्र, राज्य सरकार मागणी मान्य करेल असं वाटत नसल्याने आम्ही आता ताकदीनेच उठाव करणार आहोत, मंत्री शंभूराज देसाईंच्या शब्दाखातर आम्ही 13 जुलैपर्यंत वाट पाहणार असल्याचं मनोज जरांगे यांनी क्लिअर सांगितलंय.

राम शिंदे यांच्या पाठपुरवठ्याला यश, कर्जत- जामखेडसाठी 12 कोटी 68 लाखांचा पीकविमा मंजुर

मराठा बांधवांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी सातत्याने लावून धरलीयं. तर दुसरीकडे ओबीसी बांधवांकडून त्यांच्या मागणीला जोरदार विरोध केला जात आहे. त्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवेदन आणि मागणी करण्याचा अधिकार आहे. आमचं नाराज असल्याचं कारण नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय.

जनतेने नतद्रष्ट सरकारच्या छातीतली हवा काढली; वडेट्टीवारांचा राज्यासह केंद्र सरकारवर घणाघात

आम्हाला कायद्याचा आधार म्हणूनच…
आमच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळं आम्हाला कायद्याचा आधार आहे. मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळायला पाहिजे. मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळं सगळ्या मराठ्यांना प्रमाणपत्र देणं गरजेचं असल्याचंही जरांगे यांनी यावेळी म्हटलं आहे. त्याचबरोबर सगेसोयरेच्या अंलबजावणीची व्याख्या आमच्या म्हणण्याप्रमाणं करा, अन्यथा विधानसभेला गुलाल तुमच्यावर रुसेल असा थेट इशाराच जरांगे पाटील यांनी दिलायं.

दरम्यान, मला किंवा समाजाला वेड्यात काढू नका. नाही तर मराठा समाज म्हणेल आम्हाला फसवलं. तुम्ही 70 वर्षांपासून फसवे सरकार आहेत हे आम्हाला माहीत आहे. आम्ही दिलेली सग्या सोयऱ्याची व्याख्या पाहिजे. आम्हाला हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट आणि 33/34 च्या नोंदी लागू केल्या. तरी मराठा समाजाला आरक्षण मिळेल,. तसं पाहिलं तर एका ओळीचा हा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही ते घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज