IAS पूजा खेडकर : अपंग अन् नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट मिळालंच कसं? सामाजिक कार्यकर्त्याची चौकशीची मागणी

IAS पूजा खेडकर : अपंग अन् नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट मिळालंच कसं? सामाजिक कार्यकर्त्याची चौकशीची मागणी

IAS Pooja Khedkar : लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारल्याप्रकरणी चर्चेत असणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना अपंग आणि ओबीसी नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट मिळालंच कसं? या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलीयं. दरम्यान, पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी असलेल्या पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांची काल उचलबांगडी करत त्यांची वाशिम जिल्ह्यामध्ये बदली करण्यात आली. आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांच्या आयएएसबाबत अनेक प्रकरणे आत्ता समोर येऊ लागले आहे. त्यांनी लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारल्याप्रकरणी चांगल्याच चर्चे आल्या होत्या. आताही अपंग प्रमाणपत्र आणि ओबीसी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रावरुन त्या चर्चेत आल्या आहेत.

पवारांनी फोडला भाजपचा मोहरा; अजितदादांच्या आणखी एका शिलेदाराविरोधात ‘कडेकोट’ मोर्चेबांधणी

ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली झालीयं. खासगी गाडीवर लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारणाऱ्या या अधिकारी चांगल्याचं चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर सरकारने त्यांची वाशिमला उचलबांगडी केलीयं. वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिलं या प्रकारचे त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्या पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाल्या होत्या. दरम्यान, त्यांनी केलेले कारनामे पाहाता आता त्यांना वाशिमचा रस्ता दाखवण्यात आलायं.

Shehnaz Gill : उफ्फ्फ तेरी अदा… शहनाज गिलचा साडीतला मोहक लुक

आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांनी अपंग असलेलं सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. दिल्लीतील एम्समध्ये तब्बल सहा वेळा मेडिकल टेस्टला गैरहजर असलेल्या या आयएएस अधिकाऱ्याला आयएएस दर्जा कसा देण्यात आला असल्याची आत्ता जोरदार चर्चा सुरू आहे.

गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती ‘एसआयपी’लाच; जानेवारी ते जून एक लाख कोटींचा टप्पा ओलांडला

एवढंच नाही तर पूजा खेडकर यांनी ओबीसी नॉन क्रिमीलेअर या गटातून आयएएस पदवी मिळवली आहे. त्यांच्या वडिलांच्या अॅफिडिव्हीटमध्ये 40 कोटी उत्पन्न दाखवण्यात आलं आहे, असं असताना पूजा खेडकर यांना ओबीसी नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट मिळालं कसं? असा प्रश्न आत्ता उपस्थित झालायं. या संपूर्ण प्रकरणावर सरकारने याबाबत चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज