Pune : खासगी गाडीवर लाल दिवा, चेंबरवरही डल्ला; ट्रेनी IAS अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी वैतागले

  • Written By: Published:
Pune : खासगी गाडीवर लाल दिवा, चेंबरवरही डल्ला; ट्रेनी IAS अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी वैतागले

पुणे : आयएएस, आयपीएस अधिकारी झाल्यानंतर दोन वर्षे प्रोबेशनरी (परिविक्षाधीन) अधिकारी म्हणून काम करावे लागते. त्या काळात या अधिकाऱ्यांना कमी सुविधा मिळतात. त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे लागते. अनेकदा भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि महाराष्ट्र प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांमध्ये खटकेही उडतात हे अनेकदा दिसून आले आहे. असाच काहीसा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याबाबत अप्पर मुख्य सचिवांना थोडा थोडका नव्हे तर, 25 पानांचा अहवाल सादर केला आहे. (IAS Puja Khedkar Demands Pune Collector Write 25 pages Report )

राहुल गांधींबद्दल शरद पवारांचं मत काय?, लेट्सअप मराठीच्या महामुलाखतीत केला ‘हा’ मोठा दावा

नेमका प्रकार काय?

कोणत्याही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याला दोन वर्षांचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो. या काळात संबंधित अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये काम करावे लागते. त्यानंतर कामाचा अनुभव आल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते. याप्रमाणेच IAS असलेल्या डॉ. पुजा दिलीप खेडकर यांना 3 जून 2024 पासून पुण्यातील जिल्हाधिकार्यालयात परिवाक्षाधिन सहायक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले होते. मात्र, आता याच खेडकर यांच्याविरोधात पुण्याचे जिल्हाधिकारी असलेल्या दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित अहवाल सादर केला आहे. या अहवालात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिले असल्याचा उल्लेख करत खेडकर यांची प्रशिक्षणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात नियुक्ती करावी, तसेच त्यांच्या वडिलांची वर्तवणूक चुकीची असल्याचे म्हणत व्हॉट्सअप चॅटचे फोटोदेखील जोडले आहेत.

अहवालात नेमकं काय?

दिवसे यांनी पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे की, श्रीमती पुजा खेडकर या पुणे जिल्ह्यात 3 जून 2024 पासून परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झाल्या आहेत. मात्र, खेडकर यांनी पुणे जिल्ह्यामध्ये रूजू होण्यापूर्वीच निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्सअपद्वारे निरोप देऊन आपल्यासाठी बैठक व्यवस्था, गाडी, निवास्थान व शिपाई याबाबत वारंवार आग्रही मागणी केल्याचे म्हटले आहे. परंतु. भारतीय प्रशासकीय सेवेतील (भा. प्र. से) परिविक्षाधिन अधिकाऱ्यांना स्वतंत्र्य दालन, गाडी व शिपाई या सुविधा अनुज्ञेय नसल्याचे दिवसे यांनी नमुद केले आहे. तसेच निवास्थानाबाबत निश्चितपणे व्यवस्था करण्यात येईल असे खेडकर यांना आश्वस्त केले होते.

…अन् किर्लोस्कर पुन्हा ऑफिसला जायला लागले, शरद पवारांनी सांगितला प्रेरणादायी किस्सा

महिला अधिकाऱ्याचे अँन्टी चेंबर वापरावे

खेडकर यांना प्रशिक्षण कालावधीदरम्यान जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी आणि इतर शाखाधिकारी यांच्यासोबत बसून कामकाजाची माहिती घेण्याबरोबरच निवासी उपजिल्हाधिकारी या महिला अधिकारी असल्याने त्यांचे अँटी चेंबर वापरावे असे सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांची बैठक व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय ए विंग येथील चौथ्या मजल्यावर करण्यात आली होती. मात्र, खेडकर यांनी स्वतंत्र कक्षाला अटॅच्ड बाथरुमची सुविधा उपलब्ध नसल्याने सदर बैठक व्यवस्था नाकारली.

वडिलांसोबतच कार्यालय शोधले, अधिकाऱ्यांशी हुज्जत

वरील बैठक व्यवस्था नाकारल्यानंतर खेडकर यांनी त्यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या समवेत याच कार्यालयातील बी विंगमधील व्हीआयपी सभागृह शोधून काढले. या ठिकाणी त्यांनी इलेक्ट्रिक फिटिंगवरूनही वाद घालत ती व्यवस्थाही खेडकर यांनी नाकारली. तसेच वडिलांनी इतर अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. तुम्ही तुमची शासकीय सेवा पूर्ण होईपर्यंत अप्पर जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहचू शकणार नाही, असे शब्द दिलीप खेडकरांनी वापरले.

Team India: बीसीसीआयकडून भारतीय संघाला 125 कोटींचं वाटप होणार; कुणाला किती पैसे मिळणार?

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे अँटी चेंबर घेतले ताब्यात

वरील व्हीआयपी चेंबर नाकारल्यानंतर खेडकर यांना अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. पूजा खेडकर यांना आपले अॅंटी चेंबर वापरण्यास दिले होते. मात्र, गेल्या महिन्यात अप्पर जिल्हाधिकारी काही कामानिमित्त दोन दिवसांसाठी मंत्रालयात येथे गेले होते. त्यावेळी खेडकर यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना न देता त्यांच्या कार्यालयातील साहित्य बाहेर काढून कार्यालय ताब्यात घेतले. तसेच कर्मचाऱ्यांमार्फत आपली नेमप्लेटही बनवून घेतली.

मला अपमान सहन होणार नाही

श्रीमती खेडकर यांचा जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षण कालावधी दिनांक 14/6/2024 रोजी संपुष्टात आलेला आहे. दिनांक 15 जून ते 17 जून 2024 या सुट्टीच्या कालावधीनंतर इतर शासकीय कार्यालयांमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेणे अभिप्रेत असल्याचे दिवसे यांनी अहवालात म्हटले आहे. मात्र दिनांक 21 जून रोजी सायंकाळी श्रीमती खेडकर यांनी मला व्हॉटस्अॅपद्वारे मेसेज पाठविला व त्यामध्ये त्यांनी “माझ्याबरोबर जेवढे अधिकारी आहेत त्यांना बसण्यासाठी चेंबर व गाडीची व्यवस्था केलेली आहे, काही ठिकाणी तर निवासी उपजिल्हाधिकारी यांचे चेंबर खाली करुन त्या ठिकाणी नवीन भा.प्र.से. अधिकारी यांची सोय केलेली असल्याचे सांगितले. त्यामुळे मला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर काढल्यास माझा अपमान होणार असून, तो मला सहन होणार नाही, असा रिप्लाय पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्याचे दिवसे यांनी या अहवालात म्हटले आहे.

Maharashtra Assembly Election : मविआचं जागा वाटप कसं होणार? पवारांनी सांगितला डिटेल फॉर्म्युला

महिला अधिकारी असल्याने जाणून बुजून त्रास

पुढे दिवसे यांनी त्यांच्या अहवालात 21 जून रोजी खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी तहसिलदार सर्वसाधारण यांना भ्रमणध्वनीद्वारे “महिला अधिकारी असलेल्या माझ्या मुलीला तुम्ही सर्वजण मिळून जाणुनबुजून त्रास देत आहात, तुम्हाला या सर्व गोष्टींचा भविष्यात त्रास होईल” असा इशारा दिल्याचेही दिवसे यांनी नमुद केले आहे.

वैयक्तिक कार अन् अंबर दिवा

खेडकर या वैयक्तिक चारचाकी वाहन वापरतात. त्यावर त्यांनी अंबर दिवा लावलेला असून, मी त्यांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना शासकीय नियम सांगितले. मात्र श्रीमती खेडकर यांची एकूण वर्तणूक ही प्रशासकीय अधिकाऱ्यास शोभेल अशी नाही हे त्यांनी पाठविलेले मेसेजेस आणि त्यांच्या वर्तणूकीवरुन दिसून येते. परिविक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी हव्या असलेल्या सोईसुविधा याबद्दल आग्रह अनाठायी असून, उपरोक्त वस्तुस्थितीचे अवलोकन करता, प्रशासकीय गुंतागुंत टाळण्यासाठी श्रीमती खेडकर यांचे प्रशिक्षण पुणे जिल्हयामध्ये सुरु ठेवणे योग्य होणार नाही. त्यामुळे त्यांना प्रशिक्षणासाठी इतर जिल्हयामध्ये नियुक्ती देण्यात विनंती पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी अप्पर मुख्य सचिवांना केली आहे.

T20 WC : चर्चेत राहण्यासाठी नव्हे तर, अलिखित नियमासाठी मोदींनी लावला नाही ‘ट्रॉफी’ला हात

कोण आहेत डॉ. पुजा खेडकर?

पुजा या 2023 बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी असून, गेल्या जून महिन्यात त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा देण्यात आला होता. परंतु नियुक्तीपासूनच त्यांनी अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्या होत्या. त्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. त्यांचे आजोबा (आईचे वडील) जगन्नाथराव बुधवंत हे आयएएस अधिकारी होते. तर, वडील दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर वंचितच्या पाठिंब्यावर ते अहमदनगर दक्षिणमधून यंदाची लोकसभा निवडणूक लढले आहेत. तर, आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube