Womens World Cup Prize Money : पोरींनी वर्ल्डकप जिंकला; भारतीय संघावर पैशांचा पाऊस, आकडा ऐकून व्हाल थक्क!
भारतीय महिला संघाने फक्त वर्ल्ड कपच नाही, तर क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक बक्षीसाची रक्कम जिंकून भारतीय टीमने इतिहास रचला आहे.
Womens World Cup Prize Money : भारतीय क्रिकेट विश्वात काल भारतीय महिला संघाने इतिहास घडवलायं. महिला संघाचे कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली महिला संघाने विश्वचषक (Womens World Cup Prize Money ) जिंकून इतिहासच रचवलायं. त्यामुळे भारतीय संघावर सध्या पैशांचा पाऊसच बरसत असल्याचं चित्र दिसून येत आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ 4.48 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 40 कोटी रुपयांचं बक्षीस संघाला मिळालंय. पुरुष क्रिकेटच्या इतिहासातील बक्षीसाची ही सर्वाधिक रक्कम आहे.
पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत 52 वी राज्यस्तरीय ज्युनियर ज्यूदो स्पर्धेचे जळगावात शानदार उद्घाटन
एवढंच नाही तर प्रत्येक टीमप्रमाणे भारतीय टीमला आधीपासून निश्चित असलेली अडीच लाख डॉलर म्हणजे 2.22 कोटी रुपये सुद्धा मिळतील. त्याशिवाय लीग स्टेजमधील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला 34,314 डॉलर मिळणार आहेत. टीम इंडियाने लीग स्टेजमध्ये 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांना त्यासाठी 92 लाख रुपये मिळतील.
भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील हा एक अविस्मरणीय विजय ठरला आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पाणी पाजत महिला संघाने 52 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने 50 षटकात 7 गडी गमवून 298 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं लक्ष्य होतं. शेवटच्या चेंडूवर राधा यादव स्ट्राईकला होती. तिने फटका मारला आणि धावत सुटली. पण दोन धावा घेताना दीप्ती शर्मा 58 धावा करून रनआऊट झाली.
गणेश काळे हत्याकांडात सर्वात मोठी अपडेट; घटनेनंतर पोलिसांना आरोपींबाबत मोठ यश
या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुलवार्टनं शतकी खेळी केली केली. पण एका बाजूनं अपेक्षित साथ न लाभल्यानं तिचे प्रयत्न अपुरे ठरले. आणि भारतानं एका ऐतिहासिक विजयाला गवसणी.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलकडून भारतीय संघाला 40 कोटी रुपयांचं बक्षीस तर भारतीय क्रिकेट बोर्डकडून 51 कोटी रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. भारतीयांच्या पोरींनी विश्वचषक जिंकल्यानंतर संपूर्ण देशभरात जल्लोषाच वातावरण असून सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर संपूर्ण भारतभरात फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केलायं.
