‘समृद्धी’त मोठा भ्रष्टाचार, मोपलवारांनी कमावली 3 हजार कोटींची संपत्ती; रोहित पवारांचा गंभीर आरोप
Rohit Pawar on Radheshyam Mopalwar : समृद्धी महामार्गाच्या (Samriddhi Highway) बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे राधेश्याम मोपलवार (Radheshyam Mopalwar)यांनी 3000 कोटींची संपत्ती मिळवली असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विधिमंडळात केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
माजी मंत्री, आमदार अन् माजी आमदार.. सगळेच भाजपात; दिल्लीत ‘आप’ला मोठं भगदाड!
आमदार रोहित पवार म्हणाले की, मोपलवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही जवळचे आहेत. त्यामुळेच 2018 मध्ये निवृत्तीनंतरही मोपलवार यांची राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी, कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. विशेषत: समृद्धी महामार्ग बांधण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र, मोपलवार यांनी समृद्धीच्या कामातून स्वत:चा आणि ठेकेदारांचा फायदा करून घेतल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.
Vidhan Parishad Election : इतिहासात पहिल्यांदाच एकही मुस्लिम आमदार नाही…
ते म्हणाले, समृद्धी महामार्ग पॅकेज क्रमांक 11 चे 1900 कोटी रुपयांची निविदा गायत्री प्रोजेक्टरला देण्यात आली होती. हे काम आपल्याला जमणार नाही, असं या कंपनीने 2021 मध्ये कळवले. त्यानंतर हे काम काम हुजूर मल्टीप्रोजेक्ट कंपनीला देण्यात आले. मोपलवार यांच्या कुटुंबाकडे या कंपनीचे 23 लाख शेअर्स आहेत.
पत्नी अन् मुलींच्या नावावर कोट्यावधींची संपत्ती
मोपलवार यांची कन्या तन्वी यांच्याकडे या कंपनीचे 3 लाख 98 हजार शेअर्स आहेत, तर भाऊ सदानंद मोपलवार यांच्याकडे 23 हजार 645 शेअर्स आहेत. हुजूर मल्टीप्रोजेक्टचे 4 लाख 98 हजार असलेली मेलोरा इन्फ्रा कंपनी तन्वी मोपलवार यांच्या मालकीची आहे. मोपलवार यांच्या दुसऱ्या पत्नीकडे 150 कोटी रुपयांची, त्यांच्या तिसऱ्या पत्नीकडे 300 कोटी रुपयांची आणि त्यांच्या मुलींची संपत्ती 850 कोटी रुपयांची आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
पैसे लाटल्याचे ऑडिओ व्हायरल
दरम्यान, समृद्धी महामार्ग प्रकरणी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये मोपलवार आणि एक मध्यस्थ यांच्यात सेटलमेंट सुरू असल्याचे संभाषण होते. या ऑडिओ टेपच्या आधारे राज्य सरकारने मोपलवार यांना एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून हटवले होते. त्यांची चौकशी सुरू होती. मात्र, चौकशी समितीने मोपलवार यांना क्लीन चिट दिली होती.
स्टॅम्प पेपर घोटाळ्यातही सहभाग
तेलगी प्रकरणातील स्टॅम्प पेपर घोटाळ्यातही मोपलवार यांचा सहभाग असल्याची माहिती आहे. 1995 मध्ये मोपलवार यांनी न्यायालयात कबूल केले होते की, मुद्रांक कार्यालयात अधीक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी अब्दुल करीम तेलगी यांना स्टॅम्प आणि पेपर वेंडरचे लायसन्स दिले होते.