माजी मंत्री, आमदार अन् माजी आमदार.. सगळेच भाजपात; दिल्लीत ‘आप’ला मोठं भगदाड!

माजी मंत्री, आमदार अन् माजी आमदार.. सगळेच भाजपात; दिल्लीत ‘आप’ला मोठं भगदाड!

New Delhi : राजधानी दिल्लीत आम आदमी पार्टीचे ग्रह फिरण्यास सुरुवात झाली  (New Delhi) आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) तुरुंगात गेल्यापासून पक्षाच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत. आताही ऐन विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील दिग्गज नेते आणि माजी मंत्री राजकुमार आनंद यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. राजकुमार आनंद यांचा हा निर्णय भाजपसाठी फायद्याचा ठरणार आहे. तर आम आदमी पार्टीला मात्र मोठा फटका यामुळे बसणार आहे. छतरपूर विधानसभा मतदारसंघातील आप आमदार करतार सिंह तंवर, माजी आमदार वीना आनंद आणि नगसेवक उमेद सिंग फोगाट यांनीही भाजपाचा झेंडा हाती घेतला.

Delhi Liquor Scam : षडयंत्राचा सूत्रधार अरविंद केजरीवाल; ईडीच्या चार्जशीटमध्ये कोण-कोणते आरोप? 

या सर्व नेत्यांनी दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. याआधी एप्रिल महिन्यात राजकुमार आनंद यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पक्षाच्या धोरणावर नाराजी व्यक्त करत मंत्रि‍पदाचा राजीनामा दिा होता. दिल्लीत सध्या जो मद्य घोटाळा गाजत आहे त्याच अनुषंगाने त्यांचा हा राजीनामा होता. याच घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया तुरुंगात बंद आहेत.

राजकुमार आनंद यांनी लोकसभा निवडणुकीत नवी दिल्ली लोकसभा (New Delhi) मतदारसंघातून निवडणूक लढली होती. या निवडणुकीत त्यांना फक्त 5629 मते मिळाली होती. या मतदारसंघात भाजपाच्या बांसुरी स्वराज यांनी 78 हजार 370 मताधिक्याने विजय मिळवला. त्यांना एकूण 4 लाख 53 हजार 185 मते मिळाली. आम आदमी पक्षाचे सोमनाथ भारती 3 लाख 74 हजार 815 मते घेत दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. पटेलनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजकुमार आनंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात समाजकल्याण मंत्री होते.

मोठी बातमी : केजरीवालांना दिलासा नाहीच, न्यायालयाने ठोठावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

जुलै 2016 मध्ये करतार सिंह तंवर यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला होता. तसेच दक्षिण दिल्लीतील त्यांच्या फार्म हाऊसवरही छापेमारी करण्यात आली होती. अधिकारी सकाळी साडेआठ वाजताच धडकले होते. दिल्लीत अकरा ठिकाणी शोध मोहिम राबवण्यात आली होती. यामध्ये शंभरपेक्षा जास्त अधिकारी सहभागी झाले होते. त्यावेळी करतार सिंह तंवर यांच्या वीस कंपन्या रडारवर होत्या.

सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर करतार सिंह तंवर यांनी प्रॉपर्टीच्या कामात कोट्यावधींची संतत्ती गोळा केल्याची तक्रार आयकर विभागाला मिळाली होती. त्यानंतर आयकर विभागाच्या पथकाने त्यांच्या घरी छापे टाकले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज