Zulfikar Barodawala : काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांना (Pune Police) रात्री गस्तीवर असताना मोस्ट वॉन्टेड दहशतवादी (Most Wanted Terrorist) हाती लागले होते. त्यानंतर इसिस महाराष्ट्र टेरर मॉड्युल प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली असून हे दहशतवादी आता दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात आहे. दरम्यान, त्यानंतर मुंबईतून झुल्फिकार बडोदावाला (Zulfikar Barodawala) यालाही अटक करण्यात आली असून त्याची देखील चौकशी सुरू आहे. त्याच एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सीरियातील ‘साम-ए-पाक’ भूमीपर्यंत पोहचू शकत नसल्याने आपण भिंवडीलाच सिरिया बनवणार असा खुलासा त्याने केला आहे. (Zulfikar Barodawala expose about make Bhivandi Syria in Most Wanted Terrorist )
पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकातदादांकडं ‘सेफ’; अजितदादांच्या वक्तव्याने संभ्रम मिटला?
भिंवडीलाच सिरिया बनवायचं होतं…
पुणे आणि मुंबईमध्ये इसिस महाराष्ट्र टेरर मॉड्युल प्रकरणात अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यात सुरूवातीला पुणे पोलिसांना (Pune Police) रात्री गस्तीवर असताना मोस्ट वॉन्टेड दहशतवादी (Most Wanted Terrorist) हाती लागले होते.
ब्राझीलमध्येही तोषाखाना प्रकरण; माजी राष्ट्रपतींनी विकल्या करोडोंच्या भेटवस्तू
त्यानंतर पुणे आणि परिसरातील सुनसान जागी स्पोट करण्यासाठी बॉम्बस्फोट करण्याची प्रॅक्टीस करणाऱ्या दोन दहशतवाद्यांनी पुणे पोलिसांनी अटक केली होती. तर या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आणखी तिघांना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. अटकेत असलेल्या या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव झुल्फिकार बडोदावाला असून हा दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवत होता. तसेच, त्याचा संबंध पुणे पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही दहशतवाद्यांशी असल्याचेही राज्य दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या तपासातून उघड झाले आहे.
दरम्यान झुल्फिकार बडोदावालाच्या चौकशी दरम्यान आता आणखी धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सीरियातील ‘साम-ए-पाक’ भूमीपर्यंत पोहचू शकत नसल्याने आपण भिंवडीलाच सिरिया बनवणार असा खुलासा त्याने केला आहे. तर महाराष्ट्र टेरर मॉड्युल प्रकरणाचा हा मुख्य सुत्रधार आहे. तो मुंबईत सात रस्ता भागात राहत होता. सहा महिन्यांपूर्वी त्याने भिवंडीतील पडघा येथे स्थालांतर केले. तो 16 वर्षांपासून अंधेरित आयटी कंपनीत काम करत होता. तो त्याच्या मेहुण्याच्या म्हणजे डॉ. अदनान अलीच्या प्रभावाने दहशतवादी कारवायांना खातपाणी देत होता.