पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकातदादांकडं ‘सेफ’; अजितदादांच्या वक्तव्याने संभ्रम मिटला?

पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकातदादांकडं ‘सेफ’; अजितदादांच्या वक्तव्याने संभ्रम मिटला?

Ajit Pawar : अजित पवार समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सामील झाले. आमदारही मंत्री झाले. मात्र राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर या मंत्र्यांना काही जिल्ह्यांत ध्वजारोहणाची जबाबदारी देऊन झेंडामंत्री केले आहे मात्र जिल्ह्याच पालकत्व काही त्यांना मिळालेलं नाही. त्यातच राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा होती. सध्या पुण्याचे पालकमंत्रीपद भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावर काही धुसफूस सुरू आहे का अशीही चर्चा होत होती.

मात्र, खुद्द अजित पवार यांनीच या चर्चांचे खंडन केले असून पुण्याच्या पालकमंत्री पदावरून काहीही नाराजी नाही असे स्पष्ट केले आहे. आता अजित पवार यांनीच असे वक्तव्य केले आहे त्यामुळे पुण्याच्या पालकमंत्रीपदाच्या राजकारणाच्या चर्चा थांबतील अशी शक्यता आहे. ते म्हणाले, पुण्यात राज्यपालच ध्वजारोहण करतात. पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत कोणताच वाद नाही.

 

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते चांदणी चौकाचं उद्घाटन…

अजितदादांचा पुण्याचा अभ्यास परफेक्ट

राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही अजित पवार पुण्याचे पालकमंत्री व्हावेत अशी मागणी केली आहे. अजित पवार यांना पुणे जिल्ह्याची खडानखडा माहिती आहे. दुसरीकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापुरचे आहेत. त्यांना येथील जास्त माहिती नाही. शिवाय जिल्ह्यातील अनेक परिसरात अजितदादांचा दांडगा संपर्क आहे. विकासाच्या दृष्टीने त्यांनी याआधीही अनेक कामे केली आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्याचा विकास अजित पवार चांगल्या पद्धतीने करू शकतात असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. अजित पवारांच्या बंडानंतर पुण्यातील मोठा गट त्यांच्या पाठिशी आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या गटाची बैठक झाली होती. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी देखील अजित पवारांच्या पालकमंत्रीपदाची मागणी केली होती.

पालकमंत्रीपद घेण्यामागे अशी आहेत समीकरणे

पुण्यात शरद पवार यांच्यापेक्षा आपला गट बळकट करण्यासाटी त्यांना पालकमंत्रीपद हवे आहे. तसे पाहिले तर अजित पवार यांचे सर्वाधिक लक्ष पुणे जिल्ह्याकडेच असते. विरोधी पक्षात होते तेव्हाही ते पुण्यातच सर्वाधिक बैठका घेत होते. त्यामुळे पुण्यातील कार्यकर्ते आणि नेत्यांना अजित पवार पालकमंत्री हवे आहेत. मात्र या मागणीला भाजपकडून विरोध होत आहे. पुण्याचे पालकमंत्रीपद जर गेलं तर भविष्यात भाजपला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

‘आप’ला आणखी एक धक्का; संजय सिंह यांच्यापाठोपाठ खासदार राघव चढ्ढाचेंही राज्यसभेतून निलंबन

अजितदादा कोल्हापुरात करणार ध्वजारोहण

पुण्याच्या पालकमंत्रीपदावर अजित पवार दावा करत असल्याच्या चर्चा वारंवार सुरू असताना चंद्रकांतदादा देखील पुण्याचे पालकमंत्री पद सोडण्यास तयार असल्याचं सांगितलं जातं होतं. मात्र, आता 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणाच्या निमित्ताने पालकमंत्रीपदाचा वाद मिटला की काय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. स्वातंत्र्यदिनी पुण्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील हेच ध्वजारोहण करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवारांबरोबरच राज्याच्या इतर जिल्ह्यांत देखील राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात नव्याने सहभागी झालेल्या मंत्र्यांना भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांकडे असणाऱ्या अतिरिक्त जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मी पुणे जिल्ह्याचा अनेक वर्षांपासून आहे. पंधरा ऑगस्टचं झेंडावंदन हे राज्यपाल करतात. मंत्रालयासमोर 15 ऑगस्टचे ध्वजारोहण मुख्यमंत्री आणि 26 जानेवारीचे राज्यपाल करतात. ही वर्षानुवर्षे परंपरा आहे. मला कोल्हापूर दिलेलं आहे, मी कोल्हापूरला जाऊन ध्वजारोहण करणार. त्यामुळे काहीतरी शोधून गैरसमज पसरवण्याचे काम करू नका, असे अजित पवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube