Download App

कर्नाटक BJP कडून तब्बल दीड लाख कोटी रुपयांची लूट, प्रियंका गांधींनी केले आरोप

  • Written By: Last Updated:

1.5 Lakh Crore frouf from BJP, Priyanka Gandhi’s allegation : कर्नाटकमध्ये 10 मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Elections) मतदान होणार आहे. प्रत्येक पक्ष सत्तेसाठी आपापल्या परीने सत्तारूढ होण्याचा दावा करत आहे. मतदानाला आता अवघे काही दिवस राहिले असताना आरोप- प्रत्यारोपाची राळ उठली आहे. भाजपने राष्ट्रीय मुद्दे, मुस्लीम आरक्षण हा मुद्दा मोठा केला असून, काँग्रेसने मात्र, स्थानिक प्रश्न, भ्रष्टाचार या मुद्यांना हात घातल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळं निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेस कमबॅक करण्याची शक्यता असल्याने या निवडणुकीत काँग्रेसने (Congress पूर्ण ताकद लावली आहे. दरम्यान, कर्नाटकातील भाजप सरकारने आपल्या कार्यकाळात दीड लाख कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोप काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांनी मंगळवारी केला.

चामराजनगरच्या हणूर शहरातील एका विशाल जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी दावा केला की, जनतेचा पैसा मंत्री आणि नेत्यांच्या घरी पोहोचला असून भाजपने जनतेचा विश्वासघात केल्याचं त्यांनी सांगितलं.

प्रियंका गांधी म्हणाल्या. जर माझ्याकडे 1.5 लाख कोटी रुपये असते तर मी 100 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), 117 ईएसआय रुग्णालये, 750 किमी मेट्रो रेल्वे, 2,250 किमी द्रुतगती मार्ग आणि 30 लाख घरे बांधू शकले असते. पण, भाजपकडे असलेल्या दिडल लाख कोटी रुपयांचं काय झाले? असा सवाल त्यांनी केला.

Weather Update : राज्यात पुढील चार दिवस पाऊस थैमान घालणार, कमी दाबाचा पट्टा सक्रीय

कर्नाटकातील BJP सरकारने जनतेची निर्लज्जपणे लूट करत आहे. सरकार कुठल्याही कामासाठी जनतेकडून 40 टक्के कमिशन घेते. कर्नाटक सरकार भ्रष्टाचारी असल्याचं अनेकदा आम्ही पीएम मोदींना पत्र लिहिली, मात्र, देशाचे पंतप्रधान मौन धारण केल्याची टीका त्यांनी केली.

प्रियांका गांधी म्हणाल्या, भाजप निवडणुकीपूर्वी आणि नंतर वेगळे बोलतो, ते लवकर विसरतात. शेकडो आश्वासने देणाऱ्या भाजपने त्यांची पूर्तता केली का? रेशनचे भाव स्वस्त झाले आहेत का? तुमच्याकडे चांगले रस्ते आहेत का? तुमच्याकडे चांगली रुग्णालये आहेत का? असे सवाल जनतेला केले.

त्या म्हणाल्या, “लोकांनी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवला. इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग यांनी लोकांचा विश्वास कायम ठेवला. पण, सध्याच्या नेत्यांनी तुमचा विश्वास कायम ठेवला आहे का? देशाच्या पंतप्रधानांना एक उद्योगपती मित्र सापडला आहे. देशाचा शेतकरी 27 रुपये रोज कमावतात. पण पंतप्रधानांचे मित्र रोज लाखो कोटी कमवतात, असं सांगत भाजप सरकार कर्नाटकच्या स्वाभिमानाचा आणि संस्कृतीचा अपमान करत असल्याची टीका त्यांनी केली.

राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये दिलेली आश्वासने आमच्या सरकारने पूर्ण केल्याचा दावा त्यांनी केला.

Tags

follow us