10 Minute Delivery In Trouble Due To Heat Wave : देशभरात वाढत्या तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेल्याने ’10-मिनिटांत डिलिव्हरी’ देणाऱ्या कंपन्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. तीव्र उष्णतेमुळे दुपारच्या वेळी डिलिव्हरी पार्टनर्सनी कामाकडे पाठ फिरवली असून, याचा थेट परिणाम पुरवठा साखळीवर होत आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी कंपन्यांकडून प्रोत्साहन आणि फायदे वाढवले जात आहेत. परंतु, तरीही हे संकट कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.
मृत्युला चकवा अन् चाळीशी विसरा; रशियात तयार होतंय मनुष्याला 150 वर्षे जगवणारे औषध!
मागणी वाढली, पुरवठा घटला
उन्हाळ्यामुळे थंड पेये, आईस्क्रीम आणि कुलर यांसारख्या वस्तूंची मागणी 15 ते 20 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही होत असल्याने डिलिव्हरीसाठी रायडर्स उपलब्ध होत नाहीत. त्यातच सध्या लग्नसराई, निवडणूक आणि कापणीचा हंगाम असल्याने अनेक कामगार गावी गेल्यामुळे महानगरांमध्ये डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. तीव्र उष्णतेमुळे अनेक डिलिव्हरी पार्टनर्सनी दुपारच्या वेळी आपले कामाचे प्रमाण कमी केले आहे.
GOLD प्रचंड स्वस्त होणार! RBI चे भल्या मोठ्या दोन पानी रिपोर्टमध्ये संकेत; अनेकांच्या पोटात गोळा…
कंपन्यांकडून सवलतींचा पाऊस
कडक उन्हामुळे उद्भवलेल्या या परिस्थितीशी सामना करण्यासाठी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि बिगबास्केट सारख्या कंपन्या सरसावल्या आहेत. डिलिव्हरी बॉयना प्रति डिलिव्हरी 8 ते 15 रुपये अतिरिक्त ‘इन्सेंटिव्ह’ दिला जात आहे. तसेच, विश्रांतीसाठी जागा, ओआरएस (ORS) आणि पाण्याचे वाटप केले जात आहे. मात्र, तरीही उष्णतेचा जोर इतका आहे की, कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. यामुळे 10 मिनिटांचे वचन पाळणे कंपन्यांसाठी आता मोठे आव्हान ठरत आहे.
तारीख पे तारीख… थेट 20 वर्षांची! मुंबई HC ने 90 वर्षीय महिलेचा खटला थेट 2046 पर्यंत पुढे ढकलला
कंपन्यांचे म्हणणे आहे की, तापमानात अचानक झालेल्या वाढीमुळे मागणी अपेक्षेपेक्षा दोन ते तीन पटीने वाढली आहे, ज्यामुळे उत्पादन आणि वितरणाचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक बनले आहे. दरम्यान, ॲप-आधारित ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनने सरकारकडे गिग वर्कर्ससाठी उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण अनिवार्य करण्याची मागणी केली आहे. एकूणच, वाढत्या उष्णतेने 10 मिनिटांच्या डिलिव्हरी मॉडेलमधील कमतरता उघड केली आहे, जिथे मागणी जास्त आहे, परंतु पुरवठा कायम ठेवणे कंपन्यांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे.
