पुढील 72 तासांसाठी ‘यलो अलर्ट’, हीट वेव्हचा इशारा! पुण्यात 17-18 एप्रिलला तापमानाचा कहर

राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान झपाट्याने वाढत असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 97

Heat wave warning : महाराष्ट्रात पुढील 72 तासांसाठी उष्णतेचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान झपाट्याने वाढत असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईसह किनारपट्टी भागात पुढील 48 तास गरम आणि प्रचंड दमट वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उष्णतेसोबतच वाढलेल्या आर्द्रतेमुळे नागरिकांना उकाड्याचा अधिक त्रास जाणवू शकतो. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

दरम्यान पुणे आणि आसपासच्या भागात 17 आणि 18 एप्रिल रोजी हिट वेव्हची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील काही भागांमध्ये तापमान आधीच 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून काही ठिकाणी ते 44 अंशांपर्यंत पोहोचल्याची नोंद आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. तज्ञांच्या मते, सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत उन्हात जाणे टाळावे. आवश्यक काम असल्यास डोक्यावर टोपी, स्कार्फ आणि छत्रीचा वापर करावा. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी भरपूर पाणी, लिंबूपाणी, ताक किंवा अन्य द्रवपदार्थांचे सेवन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनात मोठे फेरबदल सुरूच; पाच वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

यादरम्यान, राज्यातील काही भागांना उष्णतेपासून दिलासा मुळण्याची देखील शक्यता आहे. 18 एप्रिलच्या सुमारास हवामान बदल होऊन काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि आपत्कालीन जोरदार वारांचा समावेश असून शकतो. विशेषतः दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास हे बदल दिसून येण्याची शक्यता आहे. एकूणच, पुढील काही दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि त्यानंतर संभाव्य अवकाळी पावसाचे मिश्र चित्र पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानातील या बदलांनुसार स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

follow us