Download App

Asad Ahemad : १० हजार चकमकी अन् १७२ हून अधिक एन्काउंटर; योगी सरकारचा असाही ‘रेकॉर्ड’

  • Written By: Last Updated:

उमेश पाल हत्याकांडातील फरार माफिया अतिक अहमदच्या मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम या दोघांना यूपी एसटीएफने एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. या दोघांवरही पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. झाशी येथे झालेल्या चकमक या दोघांचा खात्मा करण्यात आला आला आहे. पोलिसांची या दोघांजवळून विदेशी शस्त्रे जप्त केल्याचा दावा केला आहे.

Asad Ahemad Encounter : मुलाच्या एन्काउंटरची बातमी समजताच कोर्टात ढसाढसा रडला अतिक अहमद

अतिक अहमद मुलगा असद आणि गुलामचा मुलगा मकसूदन हे दोघेही प्रयागराजच्या उमेश पाल खून प्रकरणात वॉन्टेड होते. या दोघांवर पाच लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. त्यामुळे उत्तरप्रदेश सरकार आणि एन्काउंटर यांची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेश राज्याची सूत्रे हाती घेताच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारणे ही त्यांची प्राथमिकता बनवली होती. युपी सरकारने माफिया आणि गुन्हेगारांविरुद्ध झिरो टॉलरन्सचे धोरण स्वीकारले, तेव्हापासून गुन्हेगारी लोकांवर कारवाईचा वेग वाढला आहे.

पाटणा विमानतळावर बॉम्बची धमकी… एकाला उचलले!

मार्च २०१७ पासून उत्तर प्रदेशात गुन्हेगारांविरोधात सुरू झालेली योगी आदित्यनाथ सरकारची एन्काउंटर मोहीम जोरदार सुरू आहे. मार्च २०१७ पासून उत्तर प्रदेशात एकूण १०,५३१ चकमकी झाल्या आहेत. २२,५९७ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तर पोलीस चकमकीत ४७१० गुन्हेगार जखमी झाले असून १७२ गुन्हेगार पोलीस चकमकीत मारले गेले आहेत.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले होते की, “एकेकाळी कायदा- सुव्यवस्था आणि निष्पाप लोकांवर माफियांच्या अत्याचारासाठी ओळखले जाणारे राज्य आज देशातच नव्हे तर परदेशातही ‘गुन्हे आणि भयमुक्त राज्य’ म्हणून ओळखले जात आहे.”

मागील महिन्यात उत्तर प्रदेश सरकारने विधानसभेत जाहीर केलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये २०१७ पासून पोलीस चकमकींच्या संख्येच्या आकड्यात मेरठ विभाग सर्वाधिक ३,१५२ चकमकींसह पहिल्या क्रमांकावर आहे. या चकमकींमध्ये ६३ गुन्हेगार मारले गेले असून १७०८ गुन्हेगार जखमी झाले आहेत. याच चकमकीत एक पोलीस शहीद झाला असून ४०१ पोलीस जखमी झाले आहेत. तर उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण ५,९६७ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

पाटणा विमानतळावर बॉम्बची धमकी… एकाला उचलले!

गुन्हेगारांच्या प्रॉपर्टीवर बुलडोजर

मुख्यंमत्री योगी आदित्यनाथ हे सोशल मीडियावर बुलडोझर बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत. याचं कारण म्हणजे ते गुन्हेगारांवर कठोर कारवाई आणि त्यांच्या काळ्या पैशातून जमा झालेल्या प्रॉपर्टीवर बुलडोझर चालवण्याबाबत वक्तव्ये करत असतात. यूपीमधील बदललेल्या कायदा आणि सुव्यवस्थेमागे पोलिसांनी सुरु केलेला हा नवा फंडाही चर्चेत आहे.

 

Tags

follow us