Asad Ahemad Encounter : मुलाच्या एन्काउंटरची बातमी समजताच कोर्टात ढसाढसा रडला अतिक अहमद
Asad Ahemad Encounter : उमेश पाल हत्येप्रकरणी यूपी एसटीएफला मोठे यश मिळाले आहे. एसटीएफने माफिया अतिक अहमदचा मुलगा असद आणि शूटर गुलामला चकमकीत ठार केले आहे. झाशीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी उमेश पाल खून प्रकरणात अतिक अहमद आणि त्याच्या भावाला पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. यावेळी आपला मुलगा असदच्या एन्काउंटरची बातमी समजताच माफिया अतिक अहमद कोर्टरूममध्ये ढसाढसा रडल्याचे सांगितले जात आहे. मुलाची बातमी समजल्यानंतर अतिक स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि तो न्यायालयातच ढसाढसा रडू लागला.
‘काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर पार्ट्या करता, हिंमत असेल तर त्यांना’.. गायकवाडांचे ठाकरेंना चॅलेंज !
कारवाईदरम्यान STF ने अतिक अहमद आणि त्याच्या साथीदाराला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते, परंतु असद आणि गुलाम यांनी एसटीएफच्या पथकावर गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला पथकाकडूनही दोख प्रत्युत्तर देण्यात आले. यात दोघांचा मृत्यू झाला. ठार झालेल्या दोघांवरही प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. उमेश पाल यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यापासून असद आणि गुलाम फरार होते.
#WATCH | "This is a tribute to my son," says Shanti Devi, mother of slain lawyer Umesh Pal, on police encounter of former MP Atiq Ahmed's son Asad and his aide in Jhansi today pic.twitter.com/tCIYxDhOHl
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 13, 2023
काय म्हणाले योगी आदित्यनाथ
उमेश पाल खून प्रकरणातील फरार असद अहमद आणि शूटर गुलाम यांच्या एन्काऊंटरवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या कारवाईनंतर योगींनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले. सीएम योगींनी यूपी एसटीएफचे कौतुक केले आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाचे नेते सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले की, पोलीस आणि एसटीएफ त्यांचे काम करत आहेत. कायद्याच्या आधारे ठोस कारवाई करू, असे सांगत ही कारवाईही संविधानाच्या अंतर्गत असल्याचे ते म्हणाले.