‘काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर पार्ट्या करता, हिंमत असेल तर त्यांना’.. गायकवाडांचे ठाकरेंना चॅलेंज !

‘काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर पार्ट्या करता, हिंमत असेल तर त्यांना’.. गायकवाडांचे ठाकरेंना चॅलेंज !

Sanjay Gaikwad : बाबरी पाडण्यात आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची भूमिका होती की नव्हती या मुद्द्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलेल्या वक्तव्यावरून प्रचंड गदारोळ उठला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती. स्वतःला बाळासाहेबांचे वारसदार म्हणून मिरवता मग त्यांच्या अपमानानंतरही तुम्ही शांत का ?  असा सवाल त्यांनी शिंदे गटाला विचारला होता. जर तुमच्या गटात बाळासाहेबांचा अपमान करणारे असतील तर तुम्ही लाचार, लोचट आणि मिंधे आहात अशी टीका त्यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेला आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आधी बाळासाहेबांच्या नावाने दुकानदाऱ्या चालवल्या आता.. शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

ते म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या मातोश्रीवरून संपूर्ण देशाला हिंदुत्वाचे धडे दिले. त्याच मातोश्रीवर तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर बसून पार्ट्या करता, हिंमत असेल तर त्यांना लाथ मारून बाहेर काढून दाखवा. बाळासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात कधीच काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर मैत्री केली नाही. बाळासाहेब 2012 मध्ये म्हणाले होते, ज्यावेळी माझ्या मनात काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर मैत्री करण्याचा विचार येईल तेव्हा मी पक्ष बंद करेन. त्यांच्या वक्तव्याची थोडी तरी लाज वाटू द्या. संजय राऊतांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये,’ असे गायकवाड यांनी सुनावले.

चंद्रकांतदादांनी केला खुलासा

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बाबरी पाडण्यात शिवसैनिक होते की नाही याबाबत वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रचंड गदारोळ उठला होता. त्यानंतर त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत खुलासा केला होता. ‘माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता नेहमीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंबाबत श्रद्धा बाळगून आहे. त्याही मुलाखतीत मी हेच म्हटले होते. बाळासाहेबांमुळेच अनेक हिंदुत्वाच्या विचारांना चालना मिळाली. मुंबईकर असल्याने दंगली ज्या भागात व्हायच्या तेथेच मी राहायला होतो. बाळासाहेब ठाकरेंमुळेच मुंबईत हिंदू जिवंत राहिला. त्यामुळे असे विचार मनातही येणार नाही. असे तोंडातून कधीच बाहेर पडणार नाही. त्यांचे मी अनेकदा ऋणच व्यक्त केले आहे.’

उद्धव ठाकरेंना फोन करून समजावणार; ठाकरेंच्या टीकेवर चंद्रकांतदादांचा खुलासा

‘आता बाबरी ढाचा पाडण्याचा मुद्दा सुरू आहे. अयोध्येत ही रामजन्मभूमी आहे हे प्रस्थापित करण्यासाठी आंदोलन 1983 पासून सुरू झाले. विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू झाले. बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी या संघटनांच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू झाले. ढाचा पडला ती तिसरी वेळ होती. त्याआधी दोन वेळा अयोध्येच्या दिशेने कूच झाली होती आणि प्रत्येक वेळेला विश्व हिंदू परिषदेच्या नावाने झाली. त्यानंतर प्रत्यक्ष ढाचा पडताना मी त्या मुलाखतीतच म्हटले होते की हे शिवसेनेचे. हे शिवसेनेचे नाहीत असा भेद नव्हता. तर सगळे हिंदू होते.’ असे पाटील यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube