12 Percent And 28 Percent GST Slab Abolished : देशातील GST (वस्तू आणि सेवा कर) प्रणाली अधिक सोपी करण्यासाठी केंद्र सरकारनं (PM Modi) पावलं उचलली आहेत. नुकत्याच झालेल्या GoM (मंत्रिमंडळ) च्या बैठकीत महत्त्वाचा (GST Slab) निर्णय घेण्यात आला. केंद्रानं प्रस्तावित केलेल्या GST दरांवर चर्चा झाली. आता विद्यमान चार स्लॅब कमी करून फक्त दोनच स्लॅब ठेवण्यास तत्त्वत: सहमती देण्यात आली आहे.
दोनच GST स्लॅब
बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय मंत्रिसमूहानं ठरवलं की, आता कर दर फक्त 5 टक्के आणि 18 टक्के असे दोनच असतील.
– 5 टक्के स्लॅब : आवश्यक व सर्वसामान्य वस्तूंवर.
– 18 टक्के स्लॅब : बहुतांश मानक वस्तू आणि सेवांवर.
तर लक्झरी वस्तू आणि हानिकारक वस्तूंसाठी विशेष 40 टक्के करदर ठेवण्यात येणार आहे. यामुळे कर प्रणाली अधिक स्पष्ट आणि सरळ होईल, असा मंत्रिसमूहाचा विश्वास आहे.
भिवंडीत भाजपच्या पदाधिकाऱ्याची भावासह निर्घृण हत्या, पवारांच्या खासदारावर गंभीर आरोप, प्रकरण काय?
मोठा बदल कसा होणार?
आधी 12 टक्के स्लॅबमध्ये असलेल्या सुमारे 99 टक्के वस्तू आता थेट 5 टक्के स्लॅबमध्ये येणार आहे. 28 टक्के स्लॅबमधील सुमारे 90 टक्के वस्तू आता 18 टक्क्यांमध्ये हलवण्यात येणार. फक्त लक्झरी कार आणि काही हानिकारक वस्तूंवर 40 टक्के कर कायम राहील. या प्रस्तावाला उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि केरळच्या वित्त मंत्र्यांनीही पाठिंबा दिला. त्यांचं मत आहे की, या बदलामुळे कर रचनेत पारदर्शकता येईल, कर भरणाऱ्यांची संख्या वाढेल. व्यापारी आणि ग्राहक दोघांनाही दिलासा मिळेल.
मोठी बातमी, आशिया कपमध्ये खेळणार नाही पाकिस्तान, ‘या’ संघाची एन्ट्री होणार
वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांची भूमिका
केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी या बदलाचं स्वागत करताना सांगितलं की, कर दर रिजनेबल केल्याने सर्वसामान्य जनतेला थेट फायदा होणार आहे. नवीन व्यवस्थेमुळे अनेक वस्तूंवरचा कर कमी होईल, वस्तूंच्या किंमती घसतील आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल, असं त्या म्हणाल्या. म्हणजेच, आता बाजारात वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी किचकट कररचना संपुष्टात येईल आणि ग्राहकांसाठी खरेदी अधिक परवडणारी होईल.