Download App

ED, CBI विरोधात 14 पक्षांची वज्रमुठ; सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली :  केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप करत 14 विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी ५ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. विरोधी पक्षांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Sighvi) यांनी हे प्रकरण सरन्यायाधीशांसमोर मांडले आहे. देशभरातील 14 पक्षांनी केंदीय तपास यंत्रणांचा गौरवापर (Misuse Of Agencies) होत असल्याचा आरोप करत याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता या प्रकणावर येत्या 5 एप्रिलला सुनावणी होणार आहे.

विधान परिषदेत विरोधकांचा गोंधळ, निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याचं म्हणत केला सभात्याग…

“आम्ही कोणत्याही प्रलंबित प्रकरणात हस्तक्षेप करू इच्छित नाही, परंतु न्यायालयाने अटक आणि जामीन याबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावीत.” विरोधी पक्षांच्या नेत्यांना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याचेही यावेळी सिंघवी म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत काँग्रेस, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक या प्रमुख पक्षांसह एकूण चौदा राजकीय पक्षांचे नेत्यांनी आता वज्रमुठ केली आहे.

“…तर देवाशपथ सांगतो मिशा काय, भुवया पण काढून टाकेन” उदयनराजेंनी का दिलं चॅलेंज? वाचा

राहुल गांधींच्या शिक्षेनंतर काँग्रेस आक्रमक

दरम्यान, काल मोदी आडनावावरून टीका केल्याप्रकरणी सुरत न्यायालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) दोन वर्षांची शिक्षा सुनावली त्यानंतर याप्रकरणी जामीनावर त्यांची सुटका केली आहे. राहुल गांधींना अशाप्रकारे शिक्षा सुनावण्यात आल्याने काँग्रेससह देशभरातील विविध पक्षांनी सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला आहे. या निर्णयाविरोधात देशभरात काँग्रेसतर्फे आक्रमक आंदोलने केली जात आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर एक दिवसानंतर ही याचिका दाखल करण्यात आली आहे.  त्यामुळे येत्या काही दिवसात केंद्रीय यंत्रणा, मोदी सरकार आणि विरोधक यांच्यातील वाद अधिक वाढू शकतो. तसेच आता दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

“…तर देवाशपथ सांगतो मिशा काय, भुवया पण काढून टाकेन” उदयनराजेंनी का दिलं चॅलेंज? वाचा

काय म्हणाले होते राहुल गांधी

सुरत न्यायालयाने 2019 मधील एक विधानाप्रकरणी राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी निवडणूक प्रचार रॅलीत बोलताना देशातील सर्वच चोरांची आडनावं मोदी का असतात असे म्हणाले होते. त्यानंतर याप्रकरणी भाजप आमदार पुर्णेश मोदींनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा करत तक्रार दाखल केली होती. यावर काल सुरत न्यायालयाने निकाल देत राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

 

Tags

follow us