विधान परिषदेत विरोधकांचा गोंधळ, निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याचं म्हणत केला सभात्याग…
मुंबई : आज गेट वे ऑफ इंडियाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत विधानपरिषदेतील नेत्यांच्या नावाचा उल्लेख नसून हा सभागृहाचा अवमान असल्याचं सांगत काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी विधानपरिषेद गोंधळ घातला आहे. भाई जगताप यांच्यासह महाविकास आघाडीच्या इतर आमदारांनीही आक्रमक होत गोंधळ घातल्याने सभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे.
लेखक, दिग्दर्शक प्रदीप सरकार यांचं निधन, 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दरम्यान, राज्य सरकारच्यावतीने गेट वे ऑफ इंडियाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. आज सायंकाळी हा पुरस्काराचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आमदारांनी देण्यात आलंय. मात्र, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि सभापतींचं नाव नसल्याने विरोधकांकडून चांगलाचं गोंधळ घालण्यात आला आहे.
गोंधळ सुरु असताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, सभागृहाचा अवमान जोपर्यंत थांबवला जात नाही, तोपर्यंत हे सभागृह बंद करुन टाका, हे सरकार काय खाजगी संपत्ती झालीय काय? या शब्दांत त्यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. तसेच यावेळी इतर आमदारांनी सरकार तुमच्या बापाची संपत्ती आहे का? असा सवालही उपस्थित केला आहे.
Horoscope Today : ‘या’ राशींच्या लोकांनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; तणाव वाढू शकतो
यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांपाठोपाठ ठाकरे गटाचे आमदारही चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहेत.
ठाकरे गटाचे आमदार सचिन आहिर यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत शासनाच्या अनेक कार्यक्रमांच्या पत्रिकेत आमचं नाव नसतं, अशी खंत व्यक्त केली तर या कार्यक्रम पत्रिकेत विधानसभा अध्यक्षांचं नाव आहे मग विधानपरिषदेच्या सभापतींचं का नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
ठाकरे अन् फडणवीसांच्या भेटीनं शिंदे गट अस्वस्थ? मंत्री शंभुराज देसाई म्हणाले…
राज्य सरकारकडून या सभागृहाचा अवमान करण्यात आला असून जोपर्यंत सभागृहाचा अवमान थांबणार नाही तोपर्यंत आम्ही सभात्याग करत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हंटलंय. त्यानंतर विरोधकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन त्याची कदर आम्ही करत असून मागील सभेत चर्चा होऊनही पुन्हा तशीच पत्रिका समोर का आली? याची चौकशी करणार असल्याचं मंत्री उदय सामंतांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, यावेळी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सभापती निलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात मी काही सूचना किंवा निर्णय देणं योग्य नाही त्यामुळे संसदीय मंत्री आणि सरकारने यामध्ये दखल घेण्याच्या सूचना दिल्या असून सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात येत असल्याचं त्यांनी घोषित केलंय.