ठाकरे अन् फडणवीसांच्या भेटीनं शिंदे गट अस्वस्थ? मंत्री शंभुराज देसाई म्हणाले…

ठाकरे अन् फडणवीसांच्या भेटीनं शिंदे गट अस्वस्थ? मंत्री शंभुराज देसाई म्हणाले…

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)विधानभवनात एकत्र दिसले. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे विधानभवनाच्या (Vidhan Bhavan)प्रवेशद्वारापाशी एकत्र पाहायला मिळाले आणि एकमेकांशी चर्चा करतच विधानभवनात देखील गेल्याचे सर्वांनी पाहिले. त्यामुळे राजकीय (Political)वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे-फडणवीसांना एकत्र चर्चा करताना पाहून अनेकांनी तोंडातच बोटं घातली आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाईंनी (Shambhuraj Desai)उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांना एकत्र पाहून त्यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे.

दिव्यांगांकडं सरकारचं दुर्लक्ष; निलेश लंकेंनी सुनावलं

मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंना एकत्र पाहून बरं वाटलं असतं. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं असेल की, शिवसेना एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde)आहे. निवडणूक आयोगाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केले आहे. तर तुम्ही आता एकनाथ शिंदेंसोबत एकत्र काम करा, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याची चर्चा असल्याचं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीने शिंदे गटामध्ये चलबिचल झाली असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बोललं जात आहे. असं म्हटल्यानंतर मंत्री देसाई म्हणाले की, आमच्या लोकांच्या चालण्यात, बोलण्यात तसं कुठं काही जाणवतंय का? आम्ही आपले नेहमीप्रमाणे अधिवेशाचं आणि दिलेल्या विभागाचं काम करत आहोत.

चलबिचल आणि चिंता करण्याचं काम आमच्या पक्षात नाही उलट सरकार पडेल म्हणून महाविकास आघाडी तारखांवर तारखा देऊन थकली आहे. पण अजूनही सरकार पडलं नाही. कारण फडणवीस आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार भक्कमपणे सुरु असल्याचं यावेळी मंत्री शंभुराज देसाईंनी सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube