Download App

बिहारमध्ये 1700 कोटी खर्चून गंगा नदीवर बांधला जाणारा पूल कोसळला, VIDEO व्हायरल

1700 crore spent, the bridge to be built on river Ganga collapsed : बिहारमधील भागलपूरमध्ये रविवारी एक बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला. या अपघाताचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसली तरी पूल कोसळल्याने घटनास्थळी घबराट पसरली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून या घटनेला जबाबदार असलेल्या दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं सांगितलं.

खगरिया-अगुवानी-सुलतानगंज दरम्यान बांधण्यात येत असलेला पूल कोसळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. काही वेळातच संपूर्ण पूल गंगा नदीत विसर्जित झाला. आश्चर्याची बाब म्हणजे दोन वर्षांपूर्वीही या पुलाचा काही भाग कोसळला होता. 4 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या पुलाची पायाभरणी केली होती.

1717 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. एप्रिलमध्ये आलेल्या वादळामुळे या बांधकामाधीन पुलाचा काही भागही खराब झाला होता. दरम्यान, आज खगरिया-अगुवानी-सुलतानगंज दरम्यान गंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्या महासेतूचा मधला भाग कोसळला. पुलाचा वरचा भाग नदीत विसर्जित झाला आहे.

बांधकामाधीन पुलाचा वरचा भाग कोसळल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र पूल कोसळण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

डीडीसी भागलपूर कुमार अनुराग यांनी सांगितले की, बांधकामाधीन पूल कोसळल्याची घटना सकाळी 6 वाजता घडली. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक प्रशासन घटनास्थळी आहे. आम्ही ‘पुल निर्माण निगम’कडून अहवाल मागवला असल्याचं ते म्हणाले.

जेडीयू आमदार म्हणाले – दोषींवर कारवाई केली जाईल

जेडीयूचे आमदार ललित मंडल म्हणाले की, ही घटना दुर्दैवी आहे. यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या पुलाचे उद्घाटन होईल, अशी आमची अपेक्षा होती, मात्र असे अपघात घडत असतील आहेत, तर हा तपासाचा भाग आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं मंडल यांनी सांगिलतं.

विरोधी पक्षनेते विजय कुमार यांचा सरकारवर निशाणा

बांधकामाधीन पूल कोसळल्याबद्दल विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा म्हणाले की, या घटनेुळं भ्रष्ट बिहार सरकारच्या असंवेदनशीलपणाचा आणखी एक नवीन प्रकार समोर आला आहे. 2014 मध्ये 600-700 कोटी खर्चाच्या या पुलाची किंमत सुमारे 1600 कोटींवर पोहोचल्याचे ते म्हणाले. उच्च अधिकाऱ्यांनी कमिशनच्या माध्यमातून पैसे वसूल केले. या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. बिहारची जनता कधीच माफ करणार नाही

Tags

follow us

वेब स्टोरीज