Download App

कोणताही फॉर्म न भरता 2000 च्या नोटा बदलता येणार; SBI ने काढले पत्रक

2000 note exchange will be done without filling any form, SBI issued notification : 2000 च्या नोटा (2000 notes) बंद होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. याबाबत रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank) सातत्याने 2000 च्या नोटा बंद होणार नाहीत, असे सातत्याने सांगितले जात होते. दरम्यान, आरबीआयने 19 मे रोजी मोठा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आता सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) 2000 च्या नोटा बदलून घेण्याबाबत एक महत्वाची नोटीस जारी केली आहे.

आरबीआयने दोन हजाराच्या नोटबंदीची घोषणा करतांना सांगितले होते की, ज्या लोकांकडे 2000 च्या नोटा आहेत त्यांनी ताबडतोब बँकेत जाऊन त्या बदलून घ्याव्यात. नागरिक 30 सप्टेंबरपर्यंत बँकेतून 2000 च्या नोटा बदलून घेऊ शकतात, असं आरबीआयने सांगितले होते. त्यानंतर आता स्टेट बॅंक ऑफ इंडियाने एक प्रसिध्द पत्रक काढलं. त्यात पत्रकात बॅंकेकडून सांगण्यात आलं की, 20,000 रुपयांपर्यंत किंवा 2000 रुपयांच्या 10 नोटा बदलण्यासाठी कोणताही फॉर्म किंवा स्लिप भरण्याची गरज नाही, असे त्यात म्हटले आहे.

याचा अर्थ असा की तुम्ही SBI च्या कोणत्याही शाखेत जाऊन कोणताही फॉर्म न भरता सहज नोटा बदलू शकता.

शेवगावातील दंगलीवरून शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, धर्माच्या नावावर..

बँकेने जारी केलेल्या नोटीसमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, 2,000 रुपयांपर्यंतच्या 20,000 रुपयांच्या नोटा बदलून घेताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या ओळखपत्राची गरज भासणार नाही. त्यामुळं आता दोन हजाराच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांना कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही.

Tags

follow us