Download App

ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार, 28 टक्के जीएसटी लागणार…

GST Meeting : ऑनलाईन गेमिंग खेळणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. जीएसटी कॉन्सिलच्या बैठकीत ऑनलाईन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून इतरही अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. (28 percent gst will be levied on full value of Online gaming)

मोदींना टिळक राष्ट्रीय पुरस्कार; नाना पटोलेंची सडकून टीका, म्हणाले, टिळक जिवंत असते तर…

या बैठकीत थिएटरमधील खाद्यपदार्थांच्या आयातीवर सूट आणि कर्करोगावरील औषधे, ऑनलाईन गेमिंग कर, युटिलिटी वाहनांची व्याख्या, इनपुट टॅक्स क्रेडिट नोंदणी यासंदर्भातील बाबींचा समावेश होता. बैठकीत ऑनलाईन गेमिंगवरील जीएसटी वाढवण्यात आलायं तर परदेशातून वैयक्तिक वापरासाठी घेण्यात येणाऱ्या कर्करोगावरील औषधांवर जीएसटी आकारला जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

मोदींना टिळक राष्ट्रीय पुरस्कार; नाना पटोलेंची सडकून टीका, म्हणाले, टिळक जिवंत असते तर…

पश्चिम बंगालमध्ये दोन सदस्यांचा जीएसटी अपीलिय न्यायाधिकरणाच्या निर्मितीवर परिषदेच्या बैठकीत करार झाला असून त्याूसार कर्करोगाव विदेशातून विकत घेण्यात येणाऱ्या औषधांवर जीएसटी लावण्यात येणार नाही, अशी माहिती जीएसटी कौन्सिलमधील पश्चिम बंगालच्या प्रतिनिधींनी दिली आहे.

या बैठकीमध्ये थिएटरमधील खाद्यपदार्थांच्या वस्तूंवर जीएसटी कमी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता थिएटरमध्ये लागू करण्यात आलेल्या जीएसटीच्या दरामध्ये घट होणार आहे. तसेच जीएसटी कौन्सिलने कर्करोगावरील आयातीच्या औषधांवर IGST न लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच जीएसटी न्यायाधिकरणाच्या स्थापनेला परिषदेने मान्यताही या बैठकीत देण्यात आली आहे.

Tags

follow us