मोदींना टिळक राष्ट्रीय पुरस्कार; नाना पटोलेंची सडकून टीका, म्हणाले, टिळक जिवंत असते तर…

मोदींना टिळक राष्ट्रीय पुरस्कार; नाना पटोलेंची सडकून टीका, म्हणाले, टिळक जिवंत असते तर…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारावरुन काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सडकून टीका केली आहे. लोकमान्य टिळक यांना मोदींना पुरस्कार देणं आवडलं नसतं, ते जिवंत असते तर त्यांनीही विरोध केला असता, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. दरम्यान, 1 ऑगस्ट रोजी पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मैदानात हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. त्यावरुन विरोधकांकडून टीका केली जात असल्याचं दिसून येत आहे.

Maharashtra Politics : भाजपाचं ‘ऑपरेशन लोटस’ होणार फेल? राष्ट्रवादीचे ‘हे’ 5 शिलेदार मैदानात

नाना पटोले म्हणाले, पुण्यातील लोकमान्य टिळक संस्थेला पंडित जवाहरलाल नेहरुंपासून काँग्रेसने मोठी ताकद दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या आधारावर हा पुरस्कार दिला जात आहे तो त्यांचा प्रश्न आहे, याला विरोध काय करायचा त्यांना जे वाटतं आहे तसं ते करत असल्याचं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं आहे.

भारतात गरीबांची घट ! 15 वर्षांत 41 कोटी लोकांची गरीबी हटली…

तसेच आज लोकमान्य टिळक जिवंत असते तर त्यांनीही पुरस्कार देण्याला विरोधच केला असता त्यांनाही आवडलं नसतं, अशी टीका नाना पटोलेंनी केलीय. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी आज सोमवारी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली.

उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या नावाला ‘कलंक’, फडणवीसांचं नाव घेण्याची लायकी नाही; तुषार भोसलेंचा निशाणा

१ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची १०३ वी पुण्यतिथी आहे. या निमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणाऱ्या सोहळ्यात मोदी यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींना दिला जाणार आहे. पुरस्काराचे यंदाचे ४१वे वर्ष आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली आहेत. देशवासीयांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन देशाला जागितक पटलावर महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे. या कार्यासाठी ट्रस्टच्या विश्वस्तांनी मोदींच्या नावाची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube