Download App

मोठी बातमी! मध्यप्रदेशातील बालाघाटमध्ये 3 कुख्यात महिला नक्षलवाद्यांचा खात्मा

Balaghat Women Naxals Killed : सुरक्षा दलांने नक्षलविरोधी मोठी कारवाई करत मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये (Balaghat) 3 महिला नक्षलवाद्यांचा

  • Written By: Last Updated:

Balaghat Women Naxals Killed : सुरक्षा दलांने नक्षलविरोधी मोठी कारवाई करत मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये (Balaghat) 3 महिला नक्षलवाद्यांचा (Women Naxals Killed) खात्मा केला आहे. माहितीनुसार, हॉक फोर्स आणि पोलिसांनी केलेल्या या कारवाईत तीन महिला नक्षलवादी ठार झाल्या आहे. याबाबत मुख्यमंत्री मोहन यादव (CM Mohan Yadav) यांनी माहिती दिली आहे.

एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘गढी पोलिस स्टेशन हद्दीतील सुपखार वनपरिक्षेत्रातील रोंडा वन छावणीजवळ झालेल्या चकमकीत हॉक फोर्स आणि पोलिसांनी तीन कुख्यात महिला नक्षलवाद्यांना ठार केले.’ पोलिसांनी एक INSAS रायफल, एक सेल्फ-लोडिंग रायफल (SLR) आणि एक 303 रायफल याशिवाय दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तू जप्त केल्या, असे त्यात म्हटले आहे.

निवेदनानुसार, चकमकीत काही नक्षलवादी जखमी झाले, परंतु ते पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांना पकडण्यासाठी 12 पोलिस पथके शोध मोहीम राबवत आहेत. अशी माहिती या निवेदनात देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे छत्तीसगड सीमेजवळील वनक्षेत्रात झालेल्या या कारवाईत राज्य पोलिसांच्या नक्षलविरोधी ‘हॉक फोर्स’ आणि स्थानिक पोलिस पथकांनी भाग घेतला, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय डाबर यांनी सांगितले. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 90 किमी अंतरावर असलेल्या परिसरात सकाळी ही चकमक झाली आणि या संदर्भात अधिक माहितीची प्रतीक्षा आहे, असे डाबर म्हणाले.

दिल्लीत मुख्यमंत्रीपदासाठी रेखा गुप्ता की परवेश वर्मा, RSS अन् भाजप नेतृत्व कुणाला देणार पसंती ?

follow us