Download App

मोठी बातमी! दिल्ली विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली 35 काडतुसे

  • Written By: Last Updated:

Indira Gandhi International Airport : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळवर एका प्रवाशाच्या बॅगेत 35 काडतुसे सापडली आहेत. या घटनेनंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली. ज्योतिमया नंद असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे.

नवी दिल्ली ते इंदूर असा त्याला प्रवास करायचा होता. सुरक्षा स्क्रिनिंग मशिनमधून प्रवाशांचे सामान जात असताना सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यात एक संशयास्पद आकृती आढळून आली. आरोपीने एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसे आपल्यासोबत का नेली होती, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लडाखमध्ये मोठी दुर्घटना; लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने 9 जवान शहीद

सहा रिकामी काडतुसेही जप्त करण्यात आली
बॅगची झडती घेतली असता संशयास्पद दिसणारा नमुना काडतुसाचा असल्याचे आढळून आले. यानंतर बॅगेतून एक-दोन नव्हे, तर तब्बल 35 काडतुसे काढण्यात आली. याशिवाय सहा रिकामी काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी एका प्रवाशाच्या बॅगेतून देशी कट्टा जप्त झाल्याची घटना समोर आली होती.

Tags

follow us